Breaking : नक्षलवाद्यांचा सश्त्रास्त्रे बनवण्याचा कारखाना उद्धवस्त; महाराष्ट्र पोलिसांची अबुजमाडमध्ये घुसून मोठी कारवाई

मुंबई | नक्षलवाद्यांचा सश्त्रास्त्रे बनवण्याचा कारखाना उद्धवस्त करत महाराष्ट्र पोलिसांनी आज मोठी कामगिरी केली आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसवबेत माहिती दिली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या ७० जवानांनी ४८ तास आॅपरेशन करुन ही कामगिरी केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात अबुजमाड नावाचा प्रदेश आहे. हा भाग नक्षलवाद्यांचा कोअर झोन मानला जातो. अशा भागात आॅपरेशन करुन महाराष्ट्र पोलिसांनी नक्षलवाद्यांचा सश्त्रास्त्रे बनवण्याचा कारखाना उद्धस्त केला आहे. याला महाराष्ट्र पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे.

दरम्यान, या कारवाईवेळी केवळ एका जवानाला पायाला दुखापत झालेली आहे. तसेच कसल्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या या कामगिरीबद्दल कौतुक केले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like