जाणून घ्या कसे बनवतात चिकन सीस्क्टीफाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

खाऊगल्ली |चिकन सीस्क्टीफाय अलीकडच्या काळात अनेक लोकांच्या चवीला उतरणारी पाककृती बनली आहे. मात्र चिकन सीस्क्टीफायचा इतिहास जुना फार जुना आहे. चिकन सीस्क्टीफाय हि मुळची हैद्राबादची पाककृती आहे. मात्र तिला  संपूर्ण  भारतात आता लौकिक मिळाला आहे. चिकन सीस्क्टीफाय हि पाककृती हैद्राबादच्या नवाबाच्या आवडीच्या पकवानामध्ये ६५ व्या स्थानी होती. म्हणून या पाककृतीला चिकन ६५ असे नाव प्राप्त झाले

चिकन सीस्क्टीफाय बनवण्यासाठी लागणारे साहित्य 

बोन लेस चिकन पीस १५, मीठ चवी नुसार,आले लसूण पेस्ट १ चमच्या, लाल मिरचीचे तुकडे चार ते पाच, जिरी मोहरी, लाल तिखट एक चमच्या, काळी मिरी पावडर एक चमचा,गरम मसाला १चमचा, कॉर्नफ्लोअर २ चमचे, कांदा लसूण मसाला दोन चमचे, फोडणीसाठी कडीपत्ता, फेटलेलं एक अंडे एकवटी दही.

बनवण्याची कृती 

एका भांड्यात चिकनचे तुकडे टाका. त्यात एक फेटलेले अंडे, कॉर्नफ्लोअर २, चमचे मैदा २ चमचे, लाल तिखट १ चमचा, काळी मिरी पावडर अर्धाचमचा, चवी नुसार मीठ, आले लसून स्पेष्ट, लाल रंग टाकून मिश्रण एकजीव करून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण ४० मिनिटे असेच ठेवणे. चाळीस मिनिटानंतर चिकन चे तुकडे तेलावर लालसर होईपर्यत तळावे.

ग्रेव्ही करणे 

दोन चमचे तेल टाकून जिरे मोहरी कडीपत्ता लाल मिरचीचे तुकडे फोडणी साठी तापत्या कडईमध्ये टाकून घ्यावे. त्यानंतर त्यात  दही लाल तिखट आणि काळी मीर पुड चवीनुसार मीठ घालून  हे एकजीव केलेले मिश्रण फोडणीत घालावे. त्यानंतर त्या ग्रेव्ही मध्ये तळलेले चिकनचे तुकडे घालून थोडावेळ मंद आचेवर एकजीव करून घ्यावे. त्यानंतर गरमागरम चिकन सीस्क्टीफाय खाण्याचा आनंद घ्यावा.

 

Leave a Comment