नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमावर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीसाठी पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना एकटं सोडायला हवं. त्यांचा वेळ वाया घालवू नये, असं सिब्बल म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, सोमवारी दिल्लीत ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात मोदींनी विद्यार्थी आणि पालकांना अनेक सल्ले दिले. तसंच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांनाही उत्तरे दिली. मात्र, या कार्यक्रमावर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केले. तसंच मोदींवरही टीका केली. विद्यार्थ्यांना एकटं सोडायला हवं. ही वेळ बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीची आहे. मोदींनी त्यांचा वेळ वाया घालवू नये, असं ते म्हणाले.
तंत्रज्ञानाचे भय बाळगू नका, त्याचे गुलाम बनू नका- पंतप्रधान
कदाचित गेल्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात आणि या शतकाच्या सुरुवातीच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने सर्वच बदलून टाकले आहे. आज तंत्रज्ञानाने आपल्या जीवनाचा भाग बनले आहे. तंत्रज्ञानाचे भय बाळगता कामा नये. तंत्रज्ञनाला आपला मित्र मानले पाहिजे. तंत्रज्ञान माझ्यासाठी उपयोगी कसे असेल याचा विचार आपण केला पाहीजे. या तंत्रज्ञानाने आपल्यावर कब्जा करता कामा नये. आज आपण जितका काळ स्मार्टफोनवर असतो, त्यांच्यापैकी १० मिनिटं आपण आपल्या आजी-आजोबांसाठी देखील देता आला पाहिजे. ऐकेकाळी सोशल नेटवर्किंग महत्वाचं मानलं जात होतं. पूर्वी आपल्या मित्र-मैत्रीणींना वाढदिवसासाठी भेट देत होतो आता आपण सोशल मीडियावरुनच शुभेच्छा देतो. आपण तंत्रज्ञानाचा वापर जरुर करावा पण स्वतःला गुलाम बनवून घेता कामा नये.
स्वतःवर विश्वास असणं तुम्हाला यशस्वी बनवू शकतं
काही वर्षांपूर्वी झालेल्या एका क्रिकेट सामन्यात राहुल द्रविड आणि व्ही. व्ही. एस लक्ष्मण यांनी ज्या पद्धतीने खेळाची बाजी पलटली इतकेच नव्हे तर त्यांनी सामना जिंकला होता. सुरुवातीला संपूर्ण वातावरण नकारात्मक होतं. मात्र, त्यांचा सकारात्मकतेने हे शक्य केलं. एकदा भारताचा संघ वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर गेला त्यावेळी अनिल कुंबळे गोलंदाजी करु शकेल की नाही असे वाटत होते. मात्र, त्यावेळी कुंबळेने ब्रायन लाराची विकेट घेत संपूर्ण सामना बदलवला, अशा प्रकारे आपण स्वतःलाच प्रेरणा देऊ शकतो.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-
२०१४ साली सुद्धा शिवसेनेकडून काँग्रेसला सत्तेचा प्रस्ताव आला होता- पृथ्वीराज चव्हाण
जे.पी. नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष
”परीक्षा पे चर्चा २०२०LIVE”: पंतप्रधान मोदींचा विद्यार्थांशी संवाद