कोरोना मुख्यमंत्री ठाकरेंच्या दारात; मातोश्री बाहेरील चहावाला कोरोना पॉझिटिव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरातील एका चहावाला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच एकच खळबळ उडाली आहे. या चहावाल्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अंगरक्षक, मातोश्रीवर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कर्मचारी, इतर कार्यालयीन कर्मचारी चहा पिण्यासाठी जात असल्यानं प्रशासनाची झोप उडाली आहे. मातोश्रीच्या काही मीटर अंतरावर असणाऱ्या एका चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.

दरम्यान, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अंगरक्षक आणि कार्यालयीन कर्मचारी यांची तातडीने तापसणी होणार आहे. खबरदारी म्हणून मुख्यमंत्र्यांचे अंगरक्षक आणि कार्यालयीन कर्मचारी बदलले जाण्याचीही शक्यता आहे. मातोश्री परिसरात कर्तव्यावर असणारे बरेच पोलीस कर्मचारी या चहा विक्रेत्याकडे चहा पिण्यासाठी जात असत. १८० हून अधिक कर्मचारी मातोश्रीच्या या परिसरात कार्यरत असतात. या घटनेनंतर वरिष्ठ पातळींवरच्या हालचाली वाढल्या आहेत.

संपूर्ण राज्यात करोनानं थैमान घातलं आहे. राज्याला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या मंत्रिमंडळाला साथ घेत दिवसरात्र कामाला लागलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार जनतेशी संवाद साधून घराबाहेर पडू नका असं आवाहन करत आहेत. मात्र, आता मुख्यमंत्री राहत असलेल्या मोतोश्रीच्या परिसरातच आता कोरोना रुग्ण सापडल्यानं चिंतेत आणखी भर पडली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली ७८१ वर

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

करोना फोफावतोय; पिंपरी-चिंचवडमध्ये १९, तर मुंबईत ११ जणांना संसर्ग

कोरोनापासून वाचण्यासाठी घरच्या घरी ‘असा’ बनवा मास्क

शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार

Leave a Comment