दीपक चहरला कोरोनाची बाधा ?? चेन्नईवर अजून एक संकट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयपीएल संघ दुबईला पोचल्या नंतर बीसीसीआयने शनिवारी आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी दुबईत पोहोचलेल्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. पण बोर्डाने दोन्ही खेळाडूंची नाव अधिकृतपणे जाहीर केली.नव्हती. आता काही मीडिया रिपोर्ट्सनुसार ज्या खेळाडूंना कोरोना झाला आहे त्यामध्ये दीपक चहरचा देखील समावेश असल्याचे समजते. दीपकची बहिण मालती चहरने भावाचा फोटो शेअर करत एक मेसेज पोस्ट केला आहे.

शनिवारीच बीसीसीआयने १३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे म्हटले होते. हे सर्व जण चेन्नई संघातील आहेत.त्यातील 2 खेळाडू व बाकी सपोर्ट स्टाफ असल्याचं सांगण्यात आलं होतं. चेन्नई संघातील २३ वर्षीय खेळाडू ऋतुराज गायकवाड याला करोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. आता दीपक चाहरला देखील करोना झाल्याचे समजते. अर्थात बीसीसीआयकडून कोणाचे नाव जाहीर करण्यात आले नाही.

तु एक सच्चा योद्धा आहेस, ज्याचा जन्म लढण्यासाठी झालाय. रात्रीच्या अंधारानंतर दिवस होतोच. मला आशा आहे की तु पुन्हा शानदार कमबॅक करशील. मी त्याची वाट पाहते, असा मेसेज मालतीने लिहला आहे.

मालती शिवाय त्याचा भाऊ राहुल चाहरने देखील ट्विट करून लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com