लोकसभेच्या रिंगणात मी आणि सुप्रियाचं…शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघेच आगामी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी स्पष्ट केले. पुण्यात एक कार्यक्रमात पत्रकारांनी  कार्यक्रमात पत्रकारांनी घराणेशाहीच्या आरोपांबाबत विचारणा केली. तेव्हा पवार यांनी सांगितले की, ‘अजित, पार्थ किंवा रोहित हे आगामी निवडणूक लढविणार नसून मी आणि सुप्रिया सुळे दोघेच लोकसभेची निवडणूक लढविणार आहोत. पवार हे माढ्यातून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आगामी निवडणुकीत पवार कुटुंबातील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक ल‌ढविणार असल्याची जोरदार चर्चा होती. यासाठी पार्थ यांनी या मतदारसंघाला भेटी द्यायला सुरवात देखील केली होती. मात्र काळ राष्ट्रवादी अध्यक्ष यांनी पार्थ पवार आणि रोहित पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्यावरही त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे.

भाजप-शिवसेना यांच्या युतीविषयी बोलताना पवार म्हणाले, सत्तेत असताना एकमेकांवर आरोप केले आता गळ्यात गेले घालत आहेत, जनता त्यांना धडा शिकवेलच. तसेच युती होणार होती हे मला आधीच माहित होते.

इतर महत्वाचे – 

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक एकमेव पर्याय नाही – लेफ्टनंट जनरल व्ही.जी.पाटणकर

पैलवान मतिन शेख यांचे थेट छत्रपती शिवाजी महाराजांनाच पत्र

MPSC पुर्व 2019 परिक्षेचे विषयानुसार संपुर्ण विश्लेषण-1
IMG-20190220-WA0005.jpg

Leave a Comment