नेहा कक्करला ‘या’ गायकाने घातली लग्नाची मागणी;नेहाच्या घरच्यांनी देखील दिला होकार

टीम हॅलो महाराष्ट्र । आपल्या सुमधुर आवाजातून तसेच आपल्या स्क्रीन प्रेझेन्सवरून तरुणाईला वेड लावणारी प्रसिद्ध गायिका नेहा कक्करच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे. नेहा कक्कर सध्या ‘इंडियन आयडल ११ ला जज करताना दिसतेय. नेहा इंडियन आयडलच्या सेटवर रोज वेगवेगळ्या कारणांनी घेऊन चर्चेत असते. यातील नेहमीच कारण म्हणजे इंडियन आयडलचा होस्ट गायक आदित्य नारायण आणि नेहातील केमेस्ट्री.पण ही केमेस्ट्रीचे रूपानंतर आता लग्नात रूपांतर होतांना दिसत आहे.

त्यामागच कारणही तसेच आहे, नुकतेच इंडियन आयडलच्या येणाऱ्या भागात पाहुणे म्हणून सहभागी होण्यासाठी सेटवर आदित्य नारायण आपले वडील उदित नारायण आणि आई दीपा नारायण आल्या होत्या. यावेळी शोमध्ये उदित नारायण नेहाला मुलाच्या नावावरुन चिडवताना दिसणार आहेत.यानंतरच नेहाच्या लग्नाची अचानक चर्चां सुरु झाली आणिआदित्यने तिला लग्नाची मागणी घातली. ऐवढचे नाही तर आदित्यची आई दीपा नारायण सुद्धा नेहाला सून बनवण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.

Untitled design (13).jpg

नेहाचे कुटुंबीयसुद्धा या लग्नासाठी तयार होणार आहे. मात्र नेहा यावर म्हणते जर ऐवढ्या लवकर लग्न केले तर मजा नाही येणार. या संपूर्ण एपिसोडचे शूटिंग पूर्ण झाले आहे.लवकर हा एपिसोड टीव्हीवर दिसणार आहे. तसे बघायला गेले तर हे लग्न शोचा एक भाग असू शकते. कारण आदित्य या शोचा होस्ट आहे तो नेहमी नेहाशी फ्लर्ट करताना दिसतो. त्यामुळे हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे याचा उलगडा होण्यासाठा आपल्याला थोडी वाट बघावी लागेल.

महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com