रजनीकांत बियर ग्रील्सच्या मॅन vs वाइल्ड शोमध्ये दिसणार! बांदीपूर जंगलात होणार चित्रीकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सुपरस्टार रजनीकांत लवकरच बियर ग्रिल्सच्या मॅन vs वाइल्ड शोमध्ये दिसणार आहेत. मागच्या वर्षी बियर ग्रिल्सने पंत्रधान मोदी यांच्यासोबत उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट पार्क येथे चित्रीकरण केलेल्या भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. यावेळी रजनीकांतबरोबर शो करताना बियर ग्रिल्सने कर्नाटकातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाची निवड केली आहे.

दरम्यान, सुपरस्टार रजनीकांत, बियर ग्रिल्स आणि मॅन vs वाइल्ड माहितीपट निर्मात्यांची टीम सोमवारी संध्याकाळपासून या माहितीपटाच्या चित्रीकरणासाठी व्याघ्र प्रकल्पात दाखल झाली आहे. मंगळवारी ६ तास आणि गुरुवारी ६ तास अशा दोन टप्प्यात शोचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.

‘द न्यू इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राशी बोलताना वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,” २८ आणि ३० जानेवारीला दिवसाच्या वेळी केवळ सहा तास चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली आहे.” मंगळवारी होणाऱ्या चित्रीकरणात रजनीकांत सहभाग घेतील तर असून ३० तारखेला बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार देखील या शोच्या चित्रीकरणात सामील होणार असल्याचे सांगितले जात आहे.