सांगली प्रतिनिधी | कोरोना व्हायरसचा राज्यातील प्रादुर्भाव वेगाने वाढताना दिसत आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपुर येथे एकाच दिवसात कोरोनाचे १२ नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असूनहे सर्व रुग्ण एकाच कुटुंबातील असल्याचे समजत आहे.
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता १४७ वर पोहोचला आहे. सांगली जिल्ह्यात आज नवे १२ रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील एकुण कोरोनाग्रस्तांचा आकडा २३ वर पोहोचला आहे.
दरम्यान, इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील २३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सर्वात अगोदर सापडलेल्या ४ कोरोना रुग्णांचे हे नवे रुग्ण नातेवाईक असल्याचे समजत आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या २५ जणांची चाचणी जिल्हा प्रशासनाने घेतली होती. त्यातील १२ जणांचे रिपोर्ट पोझिटिव्ह आले आहेत.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
इस्लामपूरात एकाच कुटुंबातील २३ जणांना कोरोनाची लागण कशी झाली? घ्या जाणून
पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तुमचे नाव आहे का? ‘इथे’ करा चेक, वर्षाला मिळतात ६ हजार रुपये!
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली १४७ वर; तुमच्या जिल्ह्यात किती?
महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”
भारतात या ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!
नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन