पक्षाने आदेश दिला तर लोकसभा लढवेन – श्रीनिवास पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सिक्‍कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील महिण्याभरापूर्वी राज्यपाल पदाचा कार्यकाळ संपवून आपल्या मायभूमीत परतले आहेत. कराड लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिलेले पाटील २०१९ ची लोकसभा लढवणार काय या चर्चेला राजकीय वर्तुळात उधान आलेले अाहे. यापार्श्वभुमीवर पाटील यांनी सातारा येथील पत्रकार परिषदेत सुचक विधान करत ‘पक्षाने आदेश दिल्यास मी लोकसभा लढवेन’ असे म्हटले आहे.

इतर महत्वाचे –

शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले

दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?

‘सामान्य माणसांचे मत, पक्ष आणि पक्षाच्या नेत्यांचे मत विचारात घेवून पक्ष जो आदेश देईल मग तो कोणत्याही प्रकारचा असेल तो मान्य करून त्यानुसार काम करेन’ असे यावेली पाटील यांनी म्हटले आहे. ‘एकेकाळी युवक काँग्रेसचा कार्यकर्ता असताना सतरंजाच्या घड्या घालण्यापासून खुर्च्या उचलण्यापर्यंत काम केले आहे. त्यामुळे जे पडेल ते, पक्ष-नेते, सहकारी सांगतील ते काम करण्याची मानसिकता ठेवूनच मी आज सातार्‍यात आलो आहे. जर पक्षाने आदेश दिला तर लोकसभा निवडणूकही लढवेन’ असे पाटील यांनी म्हटले आहे. पाटील यांच्या या विधानाने सातारा लोकाभेची राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी उदयनराजे भोसले यांना मिळणार की श्रीनिवास पाटील यांना मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती कार्यक्रमासाठी सातार्‍यात आल्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी वार्तालाप केला.

Join Our WhatsApp Group

Leave a Comment