बीड प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अनोखी ‘भिष्य प्रतिज्ञा’ बीडच्या धरतीवर केली आहे. जो पर्यंत परळी आणि केजची जागा राष्ट्रवादी जिंकणार नाही तोपर्यंत मी बीड जिल्ह्यात फेटा बांधणार नाही अशा पण अमोल कोल्हे यांनी केज येथील जाहीर सभेत बोलून दाखवला आहे. अमोल कोल्हे यांचा सत्कार करण्यासाठी नमिता मुंदडा यांनी फेटा आणला तेव्हा कोल्हेंनी फेटा बांधून घ्यायला नकार दिला.
परळीवरून शिवस्वराज्य यात्रा अंबेजोगाईला गेली. त्याठिकाणी राष्ट्रवादीच्या नमिता मुंदडा यांनी स्वागत केले. अमोल कोल्हे यांचा सत्कार करण्यासाठी नमिता मुंदडा पुढे आल्या तेव्हा त्यांनी अमोल कोल्हेंना फेटा बांधण्यासाठी आग्रह केला. त्यावेळी अमोल कोल्हेंनी फेटा बांधण्यास नकार दिला. त्यानंतर भाषण करायला जेव्हा कोल्हे उठले तेव्हा त्यांनी फेटा नबंधण्याचे कारण सांगितले.
परळी विधानसभा मतदानसंघात भाजपच्या नेत्या आणि राज्याची महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे सध्या आमदार आहेत. भाजपकडून त्यांनाच उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे परळीत पुन्हा बहीण भावाचा सामना होणार आहे. तो मतदारसंघ जिंकण्यासाठी राष्ट्रवादी लढत प्रतिष्ठेची करणार असल्याचे बघायला मिळाले आहे. त्याच प्रमाणे केज मतदारसंघात भाजपच्या संगीता ठोंबरे यांनी राष्ट्रवादीच्या नमिता मुंदडा यांचा पराभव केला आहे. तो मतदारसंघ सुद्धा भाजप कडून काढून घेण्याचा मास्टर प्लॅन राष्ट्रवादी आखात आहे.