वंचित खेळतंय काँग्रेस आघाडीसोबत पाठशिवणीचा खेळ ; आघाडीची मोठी ऑफर वंचितने धुडकावली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीला वंचित आघाडीने काँग्रेसचे चांगलेच कंबरडे मोडले असताना आता काँग्रेस वंचितला आपल्यात सामावून घ्यायला शर्थीचे प्रयत्न करत आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या मुंबईमधील निवासस्थळी काँग्रेसचे नेते आणि वंचितचे नेते यांच्यात परवा महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. त्या बैठकीत देखील आघाडीचा तोडगा निघाला नाही असे सूत्रांनी सांगितले आहे.

नवरा कामावर गेला की बायको सुरु करायची सेक्स रॅकेट ; मुंबईत घडत होता हा धक्कादायक प्रकार

दादर येथील राजगृह या प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थळी प्रकाश आंबेडकर, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि माणिकराव ठाकरे यांच्यात परवा रात्री उशीला महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस ९६, राष्ट्रवादी ९६ आणि वंचित ९६ जागी विधानसभा निवडणूक लढेल असा फॉर्म्युला प्रकाश आंबेडकर यांच्यापुढे ठेवण्यात आला. मात्र काँग्रेसने या फॉर्म्युल्याला एक पुरवणी जोडली म्हणून हि बैठक फिस्कटली.

या तारखेला पुन्हा सुरु होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा

काँग्रेस ९६, राष्ट्रवादी ९६ आणि वंचित ९६ या विधानसभेच्या फॉर्म्युल्यात वंचितने एक झळ सोसावी असा काँग्रेसचा मानस होता. ती झळ म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे मित्र पक्ष आहेत. त्यांना ज्या काही जागा द्याव्या लागतील त्या वंचितच्या ९० जागांच्या कोठ्यातून देण्यात याव्या. याच काँग्रेसच्या आटीला प्रकाश आंबेडकर यांनी कडाडून विरोध केला आणि त्यांच्यातील बैठक तहकूब झाली. या बैठकीचा सुगावा माध्यमांना लागू नये याची पुरेपूर खबरदारी दोन्ही कडून घेतली. मात्र माध्यमांनी याचा तपास लावलाच.

आमदार भालके भाजपच्या वाटेवर ; थोरातांनी घेतली भालकेंची फिरकी

वंचित आणि काँग्रेस , राष्ट्रवादी यांच्यात आघाडी झाल्यास भाजप स्वतंत्र लढण्याचा नाद सोडून देण्याची शक्यता आहे. असे झाल्यास भाजप शिवसेनेला गोंजारत निवडणुकीचा सामना करेल. तर भाजप शिवसेना युती समोर वंचितसहित अस्तित्वात आलेल्या महाआघाडीचे तगडे आव्हान असेल.

Leave a Comment