खाऊगल्ली | चिकन चिली हा आवडीने खाल्ला जाणारा चायनीज प्रकार. आता सर्वच शहरात चायनीज रेसिपी बनवण्याची सामग्री अगदी सहज उपलब्ध होते. मग चला तर बघूया कसे बनवतात चिकन चिली.
चिकन चिलीसाठी लागणारे साहित्य| पाव किलो चिकन,आलं लसूण पेस्ट, एक अंडे , एक छोटा चमचा सोया सॉस , एक छोटा चमचा व्हिनेगर, दोन मोठे चमचे मैदा, तीन मोठे चमचे कॉर्न फ्लॉवर, चवीनुसार मीठ, दोन चमचे टोम्याटो केचप, चिरलेले एक मोठा चमचा आले, चिरलेला दोन मोठे चमचे लसूण, मिरचीचे तुकडे, सिमिला मिरची, मोठ्या पाकळ्यात चिरून कांदा, कांद्याची पात इत्यादी
कृती | पाव किलो चिकनमध्ये , आलं लसूण पेस्ट, एक अंडे , एक छोटा चमचा सोया सॉस , एक छोटा चमचा व्हिनेगर, दोन मोठे चमचे मैदा, तीन मोठे चमचे कॉर्न फ्लॉवर, चवीनुसार मीठ हे साहित्य एकजीव करून घ्या. एकजीव केलेले हे मिश्रण किमान अर्धा तास झाकून ठेवा. त्यानंतर मंद आचेवर हे तेलात तळून घ्या. त्यानंतर एका भांड्यात हे काढून ठेवा आणि चिकनची चिली बनवायला घ्या.
एका मोठ्या वाटीत अर्धाकप पाणी घ्या. पाण्यामध्ये एक चमचा व्हिनेगर, दोन चमचे चिली सॉस, दोन चमचे सोया सॉस , दोन चमचे टोम्याटो केचप, एक मोठा चमचा कॉर्न फ्लॉवर घालून मिश्रण ढवळून घ्या. त्यानंतर एका कढईत दोन चमचे तेल तापायला ठेवा. तेल तापल्यानंतर त्यात चिरलेले एक मोठा चमचा आले, चिरलेला दोन मोठे चमचे लसूण, मिरचीचे तुकडे, सिमिला मिरची, मोठ्या पाकळ्यात चिरलेला कांदा,घालून घ्या वरून वाटीत एकजीव केलेले मिश्रण घाला आणि त्याचवेळी चिकनचे तळलेले तुकडे घाला. आता चिकनला जास्तवेळ शिजू द्यायचे नाही. फक्त दोन मिनिट मोठ्या आचेवर चिकन आणि चिली एक जीव होऊ द्या. दोन मिनिटानंतर आपली चिकन चिली तयार असेल वरून कांद्याची पात टाकून चिकन चिलीला चांगले सजवा.