गोंदिया | गोंदियामध्ये एका बिबट्याला गोळ्या घालून ठार केल्याची घटना समोर आली आहे. पंजे कापलेल्या अवस्थेत बिबट्याचे मृत शरीर सापडल्याने वन्यप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बिबट्याची नखं मिळवण्याच्या हेतूने पंजे कापले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यवतमाळमधील अवनी अर्थात टी-१ वाघिणीला ठार केल्याच्या घटनेनंतर वन्यप्रेमींकडून राज्य सरकारवर टिका होत आहे. वाघ, बिबट्यावर वाढते हल्ले पाहता मनुष्य आणि वन्यप्राण्यातील संघर्ष अधीक प्रखर होताना दिसत आहे.
रविवारी गोंदियामध्ये जंगलात मृत अवस्थेत बिबट्या सापडला. वन अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याच्या पोस्टमार्टम अहवालात त्याला दोन गोळ्या झाडल्या असल्याचे समोर आले आहे. बिबट्याची नखं कापून ती विकण्याचा शिका-यांचा हेतू असल्याचे समजते आहे. वन्यप्राण्यांची कातडी, नखे यांची तस्करी मोठ्या प्रमाणावर केली जाते.
इतर महत्वाचे –