माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

माढा प्रतिनिधी| लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची पळता भुई थोडी केल्याने राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे आपली आमदारकी वाचवण्यासाठी चिंतीत असल्याचे बोलले जाते आहे. त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी करण्याची ऑफर आल्याची आणि शिंदे कार्यकर्त्यांशी संवाद साधून निर्णय घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.

विश्वचषक २०१९ | भारत ठरला ‘१ नंबर’ ; या देशांत रंगणार सेमी फायनलचे सामने

शिवसेनेने देखील भाजप सारखे फोडा आणि राज्य करा असे धोरण आखले आहे. या धोरणानुसारच राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेत सामील करून घेण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे आणखी काही आमदार आपल्या गळाला लागता का असा विचार शिवसेना करत आहे. जे आमदार स्वयंम प्रकाशित आहेत. अर्थात ज्यांचा स्वतःचा वरदहस्त मतदारसंघावर कायम आहे अशा आमदारांना आपल्या तंबूत खेचण्याचा मनसुबा शिवसेनेने बांधला आहे. म्हणून त्यांनी बबन शिंदे यांना शिवसेनेने विचारणा केली असावी असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे.

विधानसभा निवडणूक २०१९ : बीडनंतर महाराष्ट्रातील या मतदारसंघात चुलत्या पुतण्याची युद्धाची तयारी

आपली ताकद कार्यकर्ते आहेत. कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण निर्णय घेऊ असे बबन शिंदे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना कळवले आहे असे सोशल मीडियात व्हायरल संदेशात म्हणले आहे. त्यामुळे यात काय तथ्य आहे आणि असं काही घडले तर संजय शिंदे यांची भूमिका काय असणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. बबन शिंदे जर शिवसेनेत गेले तर भाजपच्या काठावर असणारे कल्याणराव काळे अपक्ष उभा राहण्याची दाट शक्यता आहे. तर काळेंना अकलूजच्या मोहिते पाटलांची छुपी मदत मिळणार हि काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्यामुळे तूर्तास सर्वांनी वेट अँड वाच असाच पवित्रा धारण केला आहे.

महेश लांडगेंना पराभूत केल्या शिवाय शेंडीची गाठ बांधणार नाही

मुख्यमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर ; इकडे सरकार पडणार!

उपवासाच्या दिवशी पाठवले बटर चिकन ; झोमॅटोला भरावा लागला ५५ हजार दंड

कम्युनिष्टाच्या हत्ये प्रकरणी भाजप आणि आरएसएस कार्यकर्त्यांना जन्मठेप ; १५ वर्षांनी लागला निकाल

मोदींचे कट्टर विरोधक अल्पेश ठाकूर यांनी भाजपला मत देऊन दिला आमदारकीचा राजीनामा

वंचितमध्ये फूट पाडण्यात विरोधक यशस्वी ? ; लक्ष्मण मानेंची वेगळ्या गटाची घोषणा

Leave a Comment