अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांची बाजू मांडली आहे. या संदर्भात माहिती स्वतः अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दोषी आहेत त्यांनाच शिक्षा झाली पाहिजे अन्यथा चाकणची परिस्थिती अजून चिगळेल असे आपण मुख्यमंत्र्यांना भेटून म्हणालो आहे असे अजित पवार यांनी म्हणले आहे.

आठवड्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे बरेच आमदार राजीनामे देऊन भाजपमध्ये येणार : चंद्रकांत पाटील

३० जुलै २०१८ रोजी मराठा आरक्षणाच्या ठोक मोर्चाला चाकण येथे हिंसक वळण लागले. हिंसेची लाट उसळण्या आधी माजी आमदार दिलीप मोहिते यांनी येथे अंदोलनकर्त्यांना भाषणाद्वारे संबोधले होते. या भाषणा दरम्यान वातावरण हिंसक बनत गेले असा संशय तपासादरम्यान व्यक्त केला आहे. त्यामुळे मागील काही दिवसात पोलिसांनी मोठा फौज फाटा चाकण आणि राजगुरू नगर मध्ये नेवून उभा केला होता. या हालचाली बघून दिलीप मोहितेंनी राजगुरू नगरच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र या संदर्भात कसलीच कारवाही केली गेली नाही त्यामुळे तुमच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी होऊ शकत नाही असे न्यायालयाने म्हणले होते. याच खटल्यात आता अजित पवार यांनी उडी घेतली आहे.

पार्थ पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया

कोणालाही टार्गेट करू नका. असे झाल्यास चाकणमधील परिस्थिती अधिकच हाताबाहेर जाईल. तपास निपक्षपातीपणे केला जावा असे अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. यासंदर्भात स्वतः अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांनी घेतले तुळजा भवानीचे दर्शन

इत्तर महत्वाच्या बातम्या –

मोदींचे कट्टर विरोधक अल्पेश ठाकूर यांचा भाजप प्रवेश

आठवड्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे बरेच आमदार राजीनामे देऊन भाजपमध्ये येणार : चंद्रकांत पाटील

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र वंचित आघाडीत जाणार

आपसातले मतभेद विसरा संकट मोठं आहे एक होऊन लढा : बाळासाहेब थोरात

राष्ट्रवादीची मान्यता जाणार ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

पार्थ पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया

युतीने तिकीट नाकारल्यास शिवसेनेचा हा जिल्हाध्यक्ष लढवणार अपक्ष निवडणूक

Leave a Comment