राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले सचिन अहिर आहेत तरी कोण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | राजकारणात कोणी कुणाचं नसतं अशी म्हण आहे. ती खरीच आहे. कारण मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर हे आज शिवसेनेत गेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. कधी काळी शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे सचिन अहिर नेमके आहेत कोण हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

इच्छुकांच्या मुलाखतीला अजित पवार सोलापुरात ; दोन आमदारांनी मारलेल्या दांडीने राष्ट्रवादीत खळबळ

सचिन अहिर हे १९९९ आणि २००४ साली शिवडी विधान सभा मतदारसंघाचे आमदार होते. त्यानंतर त्यांनी २००९ साली विधानसभा मतदारसंघ बदलण्याचा निर्णय घेतला. ते वरळी विधानसभा मतदार संघातून विधानसभेला उभा राहिले आणि निवडून देखील आले. त्याच वेळी शिवडी मतदारसंघातून मनसेचे बाळा नांदगावकर निवडून आले. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीला सचिन अहिर यांचा शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी २३ हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर आज तागायत त्यांना राजकीय व्हिजनवास भोगावा लागत आहे. त्यामुळेच ते शिवसेनेत आले आहेत अशी मुंबईत चर्चा आहे.

सचिन अहिरांच्या शिवसेना प्रवेशावर जितेंद्र आव्हाड म्हणतात

वरळी विधानसभा २०१४ साली शिवसेनेने जिंकल्याने आता सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्यात तिकिटासाठी चांगलेच मुष्टियुद्ध रंगणार आहे. वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे उभा राहण्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. त्यामुळे आता या ठिकाणी कोण उभा राहणार हे मात्र पाहण्यासारखे राहणार आहे.

२७ जुलै रोजी छगन भुजबळांचा शिवसेनेत प्रवेश!

भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढल्यास शिवसेनेला पैशाची गरज पडणार आहे. ती गरज भागवण्यासाठी सचिन अहिर यांच्यासारखे नेते फायदेशीर ठरणार आहेत. तसेच सचिन अहिर हे उद्योगपती आहेत. त्यामुळे त्यांचे देखील हात भाजप सेना सरकारच्या काळात जखडले गेले असावेत. शिवसेनेत येवून बंधिस्त धनसंचयाला मोकळी वाट करून देण्याचा मनोदय सचिन अहिरांचा असू शकतो.

विधानसभा निवडणुकीत पार्थ पवारांचे होणार कमबॅक

सचिन अहिर यांनी महाराष्ट्राचे गृहनिर्माण राज्यमंत्री पद देखील भूषवले आहे. तसेच ते म्हाडा गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष देखील होते. सचिन अहिर त्यांच्या बाबत एक बाब आणखी महत्वाची ठरते ती म्हणजे अरुण गवळी यांचे ते भाचे आहेत. पण त्यांनी दोघांनी कधीच एकत्र एका पक्षात काम करण्याचा आणि एका राजकीय व्यासपीठावर एकत्रित येणाचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे हे नाते सचिन अहिर यांच्या राजकारणाचा गौण विषय आहे.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचा आणखी एक भ्रष्टाचार उघड

Leave a Comment