पुणे प्रतिनिधी | कर्णबधीर आपल्या विविध मागण्या मान्य कराव्यात यासाठी आज शिक्षण आयुक्त कार्यालया समोर आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी काठ्या उगारत त्यांना मारहाण केली. एका पोलीस कर्मचाऱ्याला याबाबत विचारले असता त्यांनी उत्तर देनं टाळलं. लाठीचार्ज करत असताना कर्णबधिर विद्यार्थी रस्त्यावर अक्षरशः धावपळीत सैराभर पळत सुटले होते. सदर घडत घटना पाहुन पोलिसांचा निर्लज्जपणा समोर आला. आपल्या मागण्या मान्य न केल्यास येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालनारा असल्याची घोषणा यावेळी विद्यार्थ्यांनी केली. झालेल्या घटनेचा सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय.
पुणे शिक्षण आयुक्त कार्यालया च्या बाहेर दररोज जिल्ह्यातील कोणत्या ना कोणत्या भागातील विद्यार्थी आपल्याला न्याय मिळेल या उद्देशाने येतात अशा प्रकारे मारहाण करणाऱ्या पोलिसामुळे विद्यार्थ्यामध्ये भीतिच वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस हे नागरिकांच्या संरक्षणासाठी आहेत का लाठी चार्ज करण्यासाठी हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.