नवी दिल्ली | राज ठाकरेंनी निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन केली ‘हि’ मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची भेट घेऊन निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे. देशभरात जर ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात असेल तर निवडणूक हि बॅलेट पेपरवर घेतली जावी अशी मागणी राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाच्या ऑफिसमधून बाहेर येताच राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर!

निवडणूक आयोगाचा प्रतिसाद बघता कोणत्याही प्रकारे ते सहकार्य करायला तयार नव्हते. तरी देखील मी इथपर्यंत येऊन निवेदन देण्याचे महत्वाचे कारण हे की त्यांनी उद्या म्हणायला नको, तुम्ही आमच्या पर्यंत आला नाही. म्हणून मी येथे येऊन त्यांना माझी मागणी सांगितली आहे.

मी साखर उद्योगात पडलो तुम्ही पडू नका : नितीन गडकरी

दरम्यान रेल्वे इंजिन हे मनसेचे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडून काढून घेतले जाणार अशी मागे चर्चा होती. याच संदर्भात राज ठाकरे निवडणूक आयुक्तांच्या भेटीला आले होते का असा देखील कयास लावला जात होता. मात्र राज ठाकरे यांनी या संदर्भात स्पष्टोक्ती दिली आहे. आमचे निवडणूक चिन्ह हे रेल्वे इंजिनच राहणार आहे. त्याचा काही मुद्दा नव्हता. मी फक्त बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात हाच मुद्दा मांडण्यासाठी या ठिकाणी आलो होतो असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

धनगर आरक्षणावर अमोल कोल्हे म्हणतात….

राजकीय पेच सोडवण्यासाठी सर्व मंत्र्यांनी दिले राजीनामे

अजित पवार यांचा पराभव करण्यावर चंद्रकांत पाटील पुन्हा बोलले

हॅलो, चंद्रकांतदादा ! मी नारायण राणे बोलतोय ; माझ्या मुलाला वाचवा

मी नितेश राणेंवर खूनाचा प्रयत्न करण्याचे कलम लावायला सांगितले

Leave a Comment