…म्हणून मित्रानेच जाळले मित्राच्या बायकोला

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख
मैत्रीच्या नावावर काळिमा फासणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. मित्रानेच मित्राच्या बायकोच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. पंचवटीच्या गणेशवाड़ी परिसरातिल हरिसिद्धी अपार्टमेंटमध्ये रेखा बाळू मोरे ही महिला आपला नवरा, मुलगी आणि नवऱ्याचा मित्र रविंद्र भामरे यांच्यासोबत राहत होत्या. मात्र  रवींद्रने लग्न करून वेगळे राहावे अशी रेखा यांची इच्छा होती. गेले दोन महिने त्यांच्यात हा वाद सुरु होता. आज सकाळी देखील यावरून त्यांच्यात वाद झाला होता.

आज पहाटे ५ वाजता बाळू मोरे हे कामावर जाताच रविंद्रने रेखाला पेट्रोल टाकून पेटवून दिले आणि स्वतः देखिल विषारी औषध सेवन केले, या आगीची झळ घरातील वस्तूंना देखिल बसली. सकाळी ७ वाजता आग भड़कताच स्थानिक नागरिकांच्या हा सर्व प्रकार लक्षात आला आणि त्यांनी रेखा यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केल. यात सुदैवाने रेखा यांची मुलगी घरात आंघोळ करत असल्याने सुखरूप बचावली असून आरोपी रविंद्र हा देखिल किरकोळ जखमी झाला आहे.

पंचवटी पोलिस ठाणे येथील पोलीस निरीक्षक कैलास पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून असे समजते की, पंचवटी पोलिसांनी रवींद्र भामरे याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, मात्र अद्याप जळीतकांडा मागील कारण स्पष्ट नसल्याचे त्यांनी सांगितले. पुढील तपासात कारण कळेलच असे त्यांनी सांगितले.

इतर महत्वाचे –

जेव्हा बिबट्या पोल्ट्रीत शिरतो …

दहा वर्षात उदयनराजेंनी जिल्ह्याचे वाटोळे केले, पंजाबराव पाटील यांचा गंभीर आरोप

उदयनराजेंविरोधात लढणार्‍या नरेन्द्र पाटीलांनी घेतली शिवेंद्रराजेंची गळाभेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधान