मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची आज पहिली यादी जाहीर केली. उर्वरित यादी उद्या किंवा परवा जाहीर केली जाईल असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, नवाब मलिक आणि हेमंत टाकले उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील ४८ पैकी २२ जागांवर निवडणूक लढणार आहे.
पहिल्या यादीमध्ये ११ जागांची उमेदवारी घोषित करण्यात अली आहे. तसेच काही जागांवर राष्ट्रवादी – काँग्रेसमध्ये अदलाबदली करण्याचे चालू असून लवकरच चर्चा करून उमेदवारांची घोषणा केली जाईल असे त्यांनी सांगितले. हातकणंगलेची जागा स्वाभिमानी पक्षासाठी सोडण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.मात्र स्वाभिमानी पक्षाने अजून २ जागांची मागणी केली आहे यावर राष्ट्रवादी-काँग्रेस काय निर्णय घेते हे पाहावे लागेल.
मतदार संघ व उमेदवारांची नवे –
सातारा – उदयनराजे भोसले
रायगड – सुनील तटकरे
बारामती – सुप्रिया सुळे
कल्याण -बाबाजी पाटील
बुलडाणा – राजेंद्र शिंगणे
जळगाव – गुलाबराव देवकर
मुंबई उत्तर-पूर्व – संजय दीना पाटील
कोल्हापूर – धनंजय महाडिक
परभणी – राजेश विटेकर
ठाणे – आनंद परांजपे
लक्षद्विप – मोहम्मद फैजल
हातकणंगले – स्वाभिमानी शेतकरी संघटना
या यादीत मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत उमेदवार जाहीर झालेला नाही. मावळमधून पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.मात्र, पहिल्या यादीत राष्ट्रवादीने पार्थ पवार यांचे नाव जाहीर केलेले नाही.
इतर महत्वाचे –
‘या’ कारणामुळे राधाकृष्ण विखे-पाटील नगरमध्ये प्रचार करणार नाहीत
मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या मातोश्री भेटीने जिल्ह्याच्या राजकीय वर्तूळात थरकाप
श्रीनिवास पाटलांनी बांधला उदयनराजे भोसलेंना फेटा, दिड तास चर्चा