मुंबई प्रतिनिधी । ‘समाजमाध्यम ही काळाची गरज आहे, समाजमाध्यम हे वेळकाढू पणासाठी नसून ते एक साहित्य आहे, हे फक्त फॉरवर्ड व जोक्ससाठी नसून ते एक उत्कृष्ट साहित्याचा नमुना आहे. चांगल्या, उल्लेखनीय साहित्याला राज्य शासनाच्या वतीने प्रोत्साहन देण्यात येईल’ अशी ग्वाही मराठी भाषा विभाग मंत्री विनोद तावडे यांनी पहिल्या राज्यस्तरीय मराठी समाजमाध्यम संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी दिली.
पहिल्या राज्यस्तरीय मराठी समाजमाध्यम संमेलनाचे मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज मुंबईतीलयशवंतरावचव्हाण प्रतिष्ठानयेथेसंमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडला. याप्रसंगी माहिती संचालक अजय आंबेकर यांचेसह पुण्यातील डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी संस्थेचे अध्यक्ष समीर आठल्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
सामान्य जनतेच्या परिवर्तनात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या समाज माध्यमांचा सकारात्मक व विधायक कार्यासाठी वापर होने आवश्यक आहे. या समाज माध्यम वापरकर्त्यांना एकत्र आणून या विषयावर सकारात्मक सर्वांगीण चर्चा घडविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मराठीभाषा विभाग, महाराष्ट्र सायबर, राज्य मराठी विकास संस्था आणि पुण्यातील डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आजपासून मुंबईत दोन दिवसीय पहिले राज्यस्तरीय ‘मराठीसमाज माध्यम संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
दोन दिवस चालणाऱ्याया संमेलनात वादविवाद, मुलाखती, करमणुकीचे कार्यक्रम, कवितावाचन, चर्चासत्रे असे अनेक विविध कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.