Breast Cancer Awareness | आजकाल कर्करोग मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. अगदी लहान वयात देखील कर्करोगाचे प्रमाण वाढत चाललेले आहे. त्यातही स्त्रियांमध्ये स्तनांचा कर्करोग होण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. स्तनांचा पेशींमध्ये कर्करोगाच्या पेशी वाढतात. आणि त्यानंतर स्तनांचा कर्करोग होत असतो. सध्या देशामध्ये स्त्रियांमध्ये स्तनांचा कर्करोग मोठ्या संख्येने पसरत आहे. यासाठी जनजागृती करणे खूप गरजेचे आहे. आतास्तनांचा कर्करोग नक्की कशामुळे होतो? याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहे.
स्तनांचा कर्करोग झाल्यानंतर सुरुवातीला काही हलकीशी लक्षणे दिसतात. किंवा अनेक वेळा ही लक्षणे दिसतही नाही. परंतु जर या रोगाचे वेळेवर निदान झाले, तर त्यावर चांगले उपचार घेता येऊ शकते. आणि तो बरा देखील होऊ शकतो. किंवा एखाद्या व्यक्तीच्या डीएनए मध्ये बदल होतात. त्यावेळेस स्तनांचा कर्करोग होतो आणि अनेकदा आपल्याला याची कारणे माहिती नसतात. आता स्तनांचा कर्करोग कशामुळे होतो हे आपण जाणून घेणार आहोत.
वयाच्या 30 नंतर आई होणे | Breast Cancer Awareness
12 वर्षापूर्वी मासिक पाळी सुरू होणे, 30 वर्षांच्या वयानंतर तुमची पहिली गर्भधारणा होणे आणि स्तनपान न करणे यासारख्या घटकांमुळे तुमचा धोका वाढू शकतो.
जीवनशैली
जास्त वजन किंवा लठ्ठपणा, शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसणे, धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या घटकांमुळे तुमचा धोका वाढू शकतो.
हार्मोन्स
पाच वर्षांहून अधिक काळ हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी किंवा काही गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने तुमचा धोका वाढू शकतो.
वय | Breast Cancer Awareness
स्तनाच्या कर्करोगाचा धोका वयाबरोबर वाढत जातो.
कौटुंबिक इतिहास
स्तनाचा कर्करोग असलेल्या प्रथम-पदवी नातेवाईक असल्याने तुमचा धोका वाढतो.
मानसिक आघात
दीर्घकालीन प्रतिकूल भावनिक अनुभव स्त्रियांमध्ये हार्मोनल संतुलनावर परिणाम करू शकतात आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात.