BREKING NEWS : मुख्यमंत्र्यानी दिला आठ दिवसाच्या लॉकडाऊनचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंबंधात या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच आठ दिवसाचा लॉकडाऊन करायचा इशारा दिला. आता कडक निर्णय घेण्याची वेळ आली आहे, लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे. त्यामुळे आठ दिवसानी हळू हळू इतर सुविधा सुरु करू, असं म्हणत आठ दिवस तरी कडक निर्बंध पाळायला हवा मात्र इतर पक्षातील मान्यवरांची, तज्ञाची मते जाणून घेतल्यानंतर आता १४ दिवसांचा लॉककडाऊन घेण्यास काहीच हरकत नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी १४ दिवसांच्या लॉककडाऊनचा विचारही करायला काही हरकत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

ऑनलाईन होणाऱ्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे. संध्याकाळी 5 वा. या बैठकीला सुरुवात झाली. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच तीन आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. मात्र आता मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वांशी चर्चा करीत सुरवातीला आठ दिवस लॉककडाऊन करू असे संकेत दिले.

व्यापऱ्यांशी मी बोललो. होम डिलिव्हरी , टेक अवेला दोन तीन दिवस लागतील. सुरुवातीला कडक निर्बंध लावू. 8 दिवसांनी एक एक गोष्ट सुरू करू. रेमडीसीव्हिर नेहमी लागणार औषध नाही म्हणून ते परदेशातून चायनामधून रॉ मटेरियल लागतो. म्हणजे रेमडीसीविरच्या उत्पादनावर मर्यादा येतायत. कडक निर्बंध लाऊ , 8 दिवस लाऊडाऊन हा सध्या मार्ग आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Comment