BREKING NEWS : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराबाहेर शेणीच्या गोवऱ्या पेटवल्याने खळबळ

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर अज्ञाताने शेणीच्या गोवऱ्या पेटवून टाकल्याने खळबळ उडाली आहे. पोवई नाका येथील कोयना या निवासस्थानी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांच्या दरम्यान हा प्रकार घडला.

पाटण तालुक्याचे विद्यमान आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरासमोर अज्ञाताने हा प्रकार केल्याचे समजत आहे. साताऱ्यातील घरासमोर शेणीच्या गोवऱ्या पेटवण्याचे नक्की कारण अद्याप समजलेले नाही. तसेच गोवऱ्या पेटवणारे अज्ञातही कोण होते हे समजू शकलेले नाही.

घटनेची माहीती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलेली आहे. तसेच पेटवलेल्या शेणीच्या गोवऱ्या विझविण्यात आलेल्या आहेत. अचानक झालेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकाराबद्दल अनेक तर्कवितर्क बांधले जात आहेत.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा👉🏽 http://bit.ly/3t7Alba

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like