हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम बंगालमध्ये पहिल्या फेरीपासून पिछाडीवर असणाऱ्या तृणमूल काॅग्रेसच्य ममता बॅंनर्जी 1 हजार 200 मतांनी विजयी झाल्या आहेत. नंदीग्राम मतदार संघातून ममता बॅंनर्जी यांच्या विरोधात भाजपा उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्यात अटी-तटीचा सामना दिवसभर सुरू होता. अखेर शेवटच्या फेरीत विजय मिळवत शिक्कामोर्तब केला.
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव तर तृणमूल काॅंग्रेसचा विजय निश्चित दुपारपासूनच ठरलेला होता. मात्र नंदीग्राममध्ये ममता बॅंनर्जी यांची जागा पिछाडीवर होती. सुवेंदी अधिकारी हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी अवस्था तृणमूल काॅंग्रेसची होईल असे बोलले जात होते. अखेरच्या दोन फेरीपूर्वी केवळ 6 मतांनी पिछाडीवर असणाऱ्या नंदीग्राम मतदार संघातील निकालाकडे देशाचे लक्ष्य लागूल राहिले होते.
शेवटच्या फेरीत कोण बाजी मारणार, ममता बॅंनर्जी कि सुवेंदू अधिकारी या निकालाकडे लोक श्वास रोखून पहात होते. परंतु 1 हजार 200 मतांनी ममता दिदींनी आपला विजय मिळवत गड पण आणला आणि सिंह ही विजयी झाला.