सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सातारा जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. आता शाळेतील विद्यार्थीही बाधित होऊ लागले आहेत. जावली तालुक्यातील भिवडी या गावात सुरू असलेल्या शाळांमध्ये तब्बल 11 विद्यार्थी कोरोना पाॕझिटीव्ह सापडले आहेत.
सोनगाव- भिवडी गावातील धुंदीबाबा विद्यालय ही खाजगी संस्थेची शाळा आहे. इयत्ता 10 च्या विद्यार्थ्यांचे वर्ग शिकवण्यासाठी सुरू ठेवले आहेत. शासनाने दहावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या असतानाही शाळा सुरू ठेवल्या असल्याचे समोर आले आहे.
भिवंडी येथील विद्यार्थ्यांच्या पालकांनाही कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा नक्की किती होणार याविषयी गावक-यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे.