लग्न मंडपातून अचानक गायब झाली नवरी, सत्य समजताच नवदेवाच्या पायाखालची जमीन सरकली

Marrage
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ : वृत्तसंस्था – एका लग्नामध्ये एक अजब घटना घडली आहे. या घटनेत लग्नाचे ७ फेरे झाल्यानंतर नवरी अचानक लग्नमंडपातून गायब झाली आहे. नवरी लग्नातले सगळे दागिने घेऊन आपल्या प्रिकरासोबत फरार झाली आहे. हि गोष्ट सगळ्यांच्या तेव्हा लक्षात आली जेव्हा लग्नाचे बाकी विधी पूर्ण करण्यासाठी नवरीची शोधाशोध सुरू झाली. सगळीकडे शोधाशोध केली पण नवरीचा कुठेच पत्ता लागला नाही. नवरीच्या या कृत्यामुळे सगळेजण हैराण झाले आहे.

काय आहे प्रकरण
हि घटना उत्तर प्रदेशच्या प्रतापगढमधील रानीगंज या ठिकाणी घडली आहे. यामध्ये एका तरुणीचे फतनपुर भागातील एका तरुणाशी लग्न ठरले होते. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी संध्याकाळी वरात नवरीच्या घरी पोहोचली. तेव्हा मुलीकडच्या लोकांनी वरातीचे चांगले स्वागत केले. यानंतर नवरा नवरीने लग्नात सात फेरेदेखील घेतले आणि सात जन्म सोबतच राहाण्याचे वचनदेखील दिले. यानंतर नवरी वरातीचा आणि घरच्यांचा डोळा चुकवून लग्नातील सगळे दागिने घेऊन आपल्या प्रिकरासोबत फरार झाली आहे.

नवरी मंडपातून पळून गेल्याचे समजताच नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या नंतर दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला त्यानंतर त्यांनी बराच वेळ चर्चा केली. यानंतर नवरदेव नवरीला न घेताच रिकाम्या हाती आपल्या घरी परतला. या अजब लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे. दोन्ही पक्षांकडून याबाबत कोणतीही तक्रार केली गेली नाही. परिसरात सुरू असलेल्या चर्चेमुळे आम्हाला या घटनेची माहिती मिळाली आहे. दोन्ही पक्षापैकी कोणीही तक्रार केल्यास याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मत रानीगंजच्या सीओंनी व्यक्त केले आहे.