Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2024 | मुंबईला स्वप्नांची नगरी असे म्हटले जाते. मुंबईमध्ये जाऊन राहावे तिथे नोकरी करावी असे अनेकांचे स्वप्न असते. परंतु त्यांना ते पूर्ण करता येत नाही. परंतु तुम्हाला जर आता मुंबईमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर आता तुमचेही लवकर स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत एक भरती निघालेली आहे. डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि होमोडायलिसिस तंत्रज्ञ या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज निघालेले आहेत. या पदाच्या 10 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 ही आहे. त्यामुळे आता तुम्ही लवकरात लवकर या पदासाठी अर्ज करून हा ही नोकरी मिळू शकता
महत्त्वाची माहिती
पदाचे नाव
बृहन्मुंबई अंतर्गत (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2024) डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि होमोडायलिसिस तंत्रज्ञ या पदाच्या जागा भरल्या जाणार आहे
पदसंख्या
डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि होमोडायलिसिस तंत्रज्ञ या पदाच्या एकूण 10 जागा भरण्यात येणार आहेत
डेटा एनची ऑपरेटर – 7 जागा
होमोडायलीसीस तंत्रज्ञ – 3 जागा
नोकरीचे ठिकाण (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2024)
या भरती अंतर्गत जर तुमची निवड झाली तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुमचे वय 18 ते 33 वर्षे दरम्यान असणे खूप गरजेचे आहे.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
बा.य.ल. नायर धर्मा रुग्णालय डॉ. ए. एल.नायर रोड मुंबई, सेंट्रल मुंबई 400008
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2024.
शैक्षणिक पात्रता (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2024)
डेटा एन्ट्री ऑपरेटर
- या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा त्याला प्रथम प्रयत्नात 45% गुण मिळणे खूप गरजेचे आहे.
- उमेदवाराला शासनाची इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र देखील असणे गरजेचे आहे.
- त्याचप्रमाणे उमेदवाराकडे एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र गरजेचे आहे.
- उमेदवाराला संगणक सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्पीडशीट, प्रेझेंटेशन, सॉफ्टवेअर, ई-मेल, इंटरनेट इत्यादी गोष्टीचे ज्ञान गरजेचे आहे
- त्याचप्रमाणे डेटा एन्ट्री ऑपरेटरचा कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे
हेमोडायलिसीस तंत्रज्ञ
- उमेदवार हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. विज्ञान शाखा असल्यास प्राधान्य दिले जाईल.
- उमेदवाराने कमीत कमी 6 महिन्याचा डायलिसिस टेक्निशियन कोर्स उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
- डायलिसिस टेक्निशियन कामाचा अनुभव असावा.
मासिक पगार
डाटा एन्ट्री ऑपरेटर – 18000 रुपये
होमोडायलिसिस तंत्रज्ञान – 20000 रुपये
अर्ज कसा करावा
- हा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- याबद्दलची सविस्तर माहिती संकेतस्थळावर दिलेली आहे.
- अर्ज भरून झाल्यानंतर तो संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे.
- 15 मार्च 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्या आधी तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा