व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राज ठाकरे…माफी नाही तर युपीही नाही, आम्ही सापळा रचला नाही; बृजभूषण सिंह यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात सभा घेत आपण अयोध्येचा दौरा स्थगित का केला यामागचे कारण सांगितले. त्याचबरोबर त्यांनी भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर टीका केली. “माझ्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून बृजभूषण सिंह याच्या रसद पुरवली गेली. या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला. त्यावर आता बृजभूषण सिह यांनीही प्रतिक्रिया दिली असून राज ठाकरे आम्ही तुमच्या विरोधात सापळा रचलेला नाही. जोपर्यंत तुम्ही माफी मागत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्ही अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही, अशा थेट इशारा बृजभूषण यांनी दिला.

बृजभूषण सिह यांनी यूपीतील गोरखपूर येथे भाजपच्या सभेत राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले, आज राज ठाकरेंनी माझ्या विरोधात सापळा रचला गेला असल्याची टीका केली. आणि त्यांनी माफी मात्र मागितली नाही. माफी न मागून राज ठाकरे यांनी जुन्या जखमा ताज्या केल्या आहेत. त्यामुळे जो पर्यंत ते माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना यूपीत पाय ठेऊ देणार नाही.

आजच्या सभेत त्यांना माफी मागण्याची संधी होती. मात्र, त्यांनी माफी न मागून त्या संधीला ते पुन्हा मुकले. राज ठाकरे फार दुर्दैवी आहेत. दुर्दैव त्यांचा पाठलाग सोडत नाही. उत्तर प्रदेश, उत्तर भारतचे लोक महान आहेत. जर त्यांनी आमच्या संतांची माफी मागितली असती, योगींची, मोदींची माफी मागितली असती तर त्यांचा राग शांत झाला असता. माफी न मागून राज ठाकरे यांनी जुन्या ताज्या केल्या. त्यामुळे मी ठरवलंय की मी माझा कोणताही कार्यक्रम स्थगित करणार नाही. ५ रोजीची कार्यक्रम हा आम्ही करणारच आहोत, असा इशारा बृजभूषण यांनी दिला.