ब्रिटनने शब्द पाळला, भारताला व्हेन्टिलेटर्सची पहिली खेप पोहचली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. अशातच भारताच्या या संकटकाळात अनेक देशांनी भारताला मदत करण्याचे ठरवले आहे. आता ब्रिटन हुन भारताला ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर पाठवण्यात येत असून व्हेंटिलेटरची पहिली खेप मंगळवारी सकाळी दिल्लीत पोहोचली आहे

कोरोनाच्या संकट काळात इतर मित्र देशांकडून भारताला मदत मिळत आहे. मंगळवारी पहाटे गरजेची औषध आणि इतर वैद्यकीय साहित्य घेऊन ब्रिटनमधून एक विमान दिल्लीला पोहोचले. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार यामध्ये शंभर व्हेंटिलेटर आणि 95 ऑक्सिजन कन्स्ट्रेटर्स आहेत. सध्या आवश्यक उपकरण पुरवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. भारताच्या गरजा आणि आवश्यकता यांची पूर्तता करण्यासाठी सरकार विभाग दोन्ही देशांचे उच्चायुक्त ब्रिटनमधील मूळ भारतीयांमध्ये ही यावर चर्चा सुरू आहे. या आठवड्याच्या शेवटी एफसीडीओने घोषणा केली होती की भारत सरकार सोबत चर्चेनंतर कोरोना विरोधी लढ्यात मदतीसाठी सहाशेहून अधिक वैद्यकीय उपकरणे भारतात पाठवण्यात येतील.

याबाबत बोलताना ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डॉमिनिक रॅब यांनी म्हटलं आहे की, ‘आमचा पहिला वैद्यकिय पुरवठा आता भारतात आला आहे हे पाहून चांगले वाटले. जिथे जास्त आवश्यकता आहे त्या ठिकाणी ते पोहोचवले जाईल. कोणीही सुरक्षित नाही जोपर्यंत सर्वजण सुरक्षित नाहीत अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली आहे. या जागतिक धोक्याविरुद्ध लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य महत्त्वाचे आहे’ असे देखील ब्रिटनचे परराष्ट्र सचिव यांनी म्हटले आहे.

यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी सांगितलं होतं की ‘कोरोना पासून लोकांचा जीव वाचवण्यासाठी शेकडो ऑक्सिजन कॉन्ट्रॅक्टर्स आणि व्हेंटिलेटर सह महत्त्वाची उपकरणे ब्रिटन मधून भारतात पोहोचतील. भारतासोबत ब्रिटन एक मित्र आणि सहकारी म्हणून कठीण काळात उभा आहे’. असे त्यांनी म्हटले होते. दरम्यान एफसीडीओ देणार असलेली पुढची खेप याच आठवड्यात मिळेल. यामध्ये नऊ एअरलाइन्स कंटेनर लोड असणार आहेत. या 495 ऑक्सिजन कॉन्संट्रेशन , 120 नॉनइव्हेंजीव व्हेन्टिलेटर्स आणि 20 मॅन्युअल व्हेंटीलेटर यांचा समावेश आहे.

Leave a Comment