ब्रिटीश पंतप्रधान बाॅरिस जाॅन्सन यांचा राजीनामा; ‘हे’ आहे कारण

0
121
Boris Johnson
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अनेक मंत्र्यांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर अविश्वास व्यक्त केला होता. त्यामुळे अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे गेल्या 48 तासात त्यांच्या 50 हून अधिक मंत्री आणि खासदारांनी राजीनामा दिला आहे.

ब्रिटनमध्ये खासदार ख्रिस पिंचर यांच्यावर मद्यधुंद अवस्थेत लैंगिक शोषण आणि गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता. याची माहिती असूनही ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांना पदोन्नती दिली होती, त्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाला. तसेच स्वपक्षीय नेतेही बोरिस यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले. त्यामुळे पीएम जॉन्सन यांच्यावर खुर्ची सोडण्याचा दबाव वाढला होता. अखेर त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.

ख्रिस पिंचर यांच्यावर याआधी देखील लैंगिक शोषणचा आरोप झाला होता. यावेळी मात्र विरोधी पक्ष आणि स्वपक्षीय आक्रमक झाल्याने ख्रिस पिंचर यांची पाठराखण करणे बाॅरिस जाॅन्सन यांना चांगलंच महागात पडले . आणि त्यांना सत्ता गमवावी लागली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here