ब्रिटीश रिसर्चर्सचा दावा,”कोरोना लस घेतल्यानंतर, डेल्टा व्हायरसच्या संसर्गाचा धोका 60 टक्क्यांनी कमी होतो”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही, कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएन्टच्या संसर्गाचा धोका देखील 50 ते 60 टक्क्यांनी कमी होतो. इंपीरियल कॉलेज ऑफ लंडनच्या संशोधकांनी त्यांच्या अभ्यासात हा दावा केला आहे. संशोधकांच्या मते, ज्यांनी लस घेतली नाही त्यांच्यामध्ये संसर्गाचा धोका लसीकरण केलेल्यांपेक्षा तीन पट जास्त आहे. या संशोधनासाठी 98,233 लोकांच्या घरी जाऊन नमुने घेण्यात आले. 24 जून ते 12 जुलै दरम्यान नमुन्याची PCR टेस्ट घेण्यात आली. त्यापैकी 527 लोकं पॉझिटिव्ह आले. या 527 पॉझिटिव्ह नमुन्यांपैकी 254 नमुन्यांची पुन्हा प्रयोगशाळेत चाचणी करून विषाणूचे मूळ समजले. या रिपोर्टमध्ये असे दिसून आले आहे की, यापैकी 100 टक्के नमुन्यांमध्ये डेल्टा व्हायरस आहे.

इम्पीरियल कॉलेजमधील महामारीविज्ञानी पॉल इलियट म्हणतात,”कोरोनाविरुद्धच्या लसीची प्रभावीता तपासण्यासाठी आम्ही लोकांमधून रँडम सॅम्पल घेतले. लक्षणे नसलेल्या रुग्णांचाही यात समावेश होता. या संशोधनाच्या मदतीने संक्रमित आणि रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमधील संबंध समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पब्लिक हेल्थ इंग्लंडमधील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, जर डेल्टा विषाणूची लागण झाली तर रुग्णाला रुग्णालयात दाखल होण्याची अधिक शक्यता असते. अशा परिस्थितीत लसीच्या मदतीने रुग्णांसाठी सुरक्षा चक्र तयार करणे हा एक दिलासा आहे. लस घेणाऱ्यांमध्ये संक्रमणाचा धोका 0.40 टक्के आहे. त्याच वेळी, ज्यांनी लस घेतली नाही त्यांच्यामध्ये हा धोका तीन पटीने जास्त म्हणजे 1.21 टक्के पर्यंत होता.

इंपीरियल कॉलेजने तरुणांसाठी एक सर्वे केला आहे. 24 जून ते 12 जुलै दरम्यान केलेल्या सर्वेनुसार इंग्लंडमधील प्रत्येक 160 लोकांमध्ये संसर्गाचा धोका 4 पटीने वाढला आहे. सर्वेनुसार, तरुणांमध्ये संसर्गाची प्रकरणे वाढली होती. येथे संक्रमणाची 50 टक्के प्रकरणे 5 ते 24 वर्षांच्या तरुणांमध्ये दिसून आली. त्यामुळे शाळा बंद होत्या. हेच कारण आहे की,”शिखरावर पोहोचण्याआधीच कोरोनाची प्रकरणे कमी झाली.”

Leave a Comment