हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Brittle Bones) घरातील प्रत्येकाची लहान मोठी काम करताना महिला स्वतःच्या आरोग्याकडे सपशेल दुर्लक्ष करतात. अनेकदा अख्ख्या दिवसाचा ताण येऊनही महिला न थांबता काम करत असतात. सकाळी अंथरुणातून उठल्या की, थेट रात्रीच अंथरुणाला पाठ टेकतात. दरम्यान, बऱ्याच महिला अनेकदा पाठ आणि पाय दुखण्याची तक्रार करतात. त्यांच्या हाडांमध्ये प्रचंड वेदना होत असल्याचे म्हणतात. असे असूनही त्या हसत हसत अशा समस्यांकडे दुर्लक्ष करतात.
मात्र, हाडं दुखण्याची समस्या ही किरकोळ वाटत असली तरीही गंभीर आहे हे लक्षात घ्यायला हवे. हाडांमध्ये वेदना होत आहेत, याचा अर्थ आपली हाडे ठिसूळ वा कमकुवत आहेत. त्यामुळे या समस्येकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. म्हणूनच, आज आपण महिलांमध्ये वाढत असलेल्या या समस्येमागील कारण जाणून घेणार आहोत.
हाडे ठिसूळ होण्याचे कारण (Brittle Bones)
सतत बसून किंवा खूप वेळ उभं राहून काम करण्याच्या सवयींमुळेदेखील हाडांमध्ये वेदना जाणवतात. या वेदना आपली हाडे कमकुवत होत असल्याचे लक्षण आहे. प्रामुख्याने शरीरात व्हिटॅमिन डी आणि पोषक तत्वांची कमतरता झाल्यास हाडांची झीज व्हायला सुरुवात होते. वाढत्या वयाबरोबर शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता झाल्याचा सगळ्यात जास्त प्रभाव हाडांवर होतो आणि हाडे ठिसूळ होऊ लागतात.
शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास हाडे दुखणे, सांधेदुखी, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात यांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते. (Brittle Bones) खास करून गर्भधारणेनंतर महिलांच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. यावेळी व्हिटॅमिन डीची कमतरता होण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे महिलांमध्ये हाडे लवकर ठिसूळ होण्याची समस्या दिसून येते. महिलांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास त्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागते? ते जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
सतत आजारपण
आपल्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर त्याचा परिणाम थेट आपल्या रोग प्रतिकार शक्तीवर होतो. त्यामुळे ज्या महिलांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असते त्या वारंवार आजारी पडतात. (Brittle Bones) रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे कोणताही संसर्गजन्य विषाणू आणि जीवाणू त्यांच्या शरीरावर सहज हल्ला करतात. ज्यामुळे सर्दी, खोकला, ताप असे आजारपण वारंवार येते.
हाडांमध्ये तीव्र वेदना
महिलांच्या शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडांची लवकर झीज होते. परिणामी हाडं ठिसूळ होत जातात आणि हाडे कमकुवत झाल्याने शारीरिक वेदना वाढतात. त्यामुळे महिलांना हाडे मजबूत ठेवण्यासाठी शरीरात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची मात्रा कमी होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. अन्यथा सतत होणाऱ्यावेदना असह्य होऊ लागतात. (Brittle Bones)
शारीरिक अशक्तपणा
जसजसं वय वाढत तसतशा महिला जास्त दमू लागतात. लहान सहन काम करताना देखील त्यांना थकवा जाणवू लागतो. अशक्तपणामूळे बऱ्याचदा त्यांना काही काम होत नाही. अशा वेळी त्यांना व्हिटॅमिन डीची गरज आहे हे लक्षात घ्या. कारण व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाणही कमी होते. परिणामी शारीरिक अशक्तपणा जाणवू लागतो.
जखम लवकर बरी होत नाही
जर एखाद्या महिलेच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर एखादी जखम लवकर बरी होत नाही. (Brittle Bones) अगदी किरकोळ जखमा देखील बराच काळ त्रास देतात. त्यात जर काही पुनर्प्राप्ती किंवा शस्त्रक्रिया झाली असेल तर अशा महिलांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागते.