डॉक्टराचे घर फोडून तब्बल 100 तोळे सोने अन् 10 लाखाची रोकड लंपास; कर्फ्युच्या पहिल्याच रात्री घडली घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | डॉक्टराचे घर फोडून चोरट्यांनी घरातील शंभर तोळे सोने आणि दहा लाख रुपये रोग असा सुमारे 50 ते 70 लाखाचा मुद्देमाल चोरल्याची घटना आज पहाटे शहरातील प्रताप नगर भागात उघडकीस आली. कर्फ्यू च्या पहिल्याच रात्री अशा प्रकारे पोलिसांना आव्हान देत धाडसी चोरी घडल्याने पोलिसांच्या रात्र गस्तीवर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण होत.

डॉ.सुषमा सोनी (रा.प्रतापनगर, उस्मानपुरा) हे परिवारासह देवदर्शनासाठी बाहेर राज्यात गेले आहे. बंद घर असल्याची संधी साधत चोरट्यानी घराला लक्ष केले. घराचा समोरील दरवाजा तोडून चोरट्यानी आत मध्ये प्रवेश केला व घरामध्ये ठेवलेले सुमारे 100 तोळे सोन्याचे दागिने व रोख 10 लाख रुपये असे सुमारे 50 ते 60 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यानी लंपास केला आहे.

आज सकाळी जेंव्हा घरातील काम करणारे नोकर साफसफाई साठी गेले तेंव्हा हा सर्व चोरीचा प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता,उपयुक्त निकेश खाटमोडे, उपयुक्त दीपक गिर्हे सह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment