विजयवाडा । कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांवर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे. यामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचं प्रमाणही वाढलं आहे. १३ हजार रुपयांसाठी आपल्या बहिणीही कुंटणखान्यात विकल्याचे धक्कादायक प्रकार आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील सिंगरकोंडा येथे घडला आहे. कुंटणखान्यावर कारवाई केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.
पीडित मुलीनं १०० क्रमांकावर फोन करून मदत मागितली होती. पोलिसांनी तात्काळ सिंगरकोंडा येथील कुंटणखान्यावर १८ जुलैला छापा टाकला. त्यानंतर या मुलीची सुटका करण्यात आली, अशी माहिती कांदुकुर पोलीस ठाण्यातील निरीक्षक विजय कुमार यांनी दिली. आई-वडील यांच्यात सतत वाद होत असल्यानं पीडित मुलगी ही सावत्र भावासोबत राहत होती. वडिलांनी दुसरं लग्न केल्यानं मालमत्तेवरून वाद होत होते. त्यानंतर सावत्र भाऊ आणि त्याच्या पत्नीनं मुलीला नेल्लोर जिल्ह्यातील कवाली येथून सिंगरकोंडा येथे नेलं. त्यानंतर कुंटणखान्यात नेऊन विकलं. त्या मोबदल्यात त्यानं २७ हजार रुपये घेतले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पीडित मुलीनं १०० क्रमांकावर फोन करून याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी कुंटणखान्यावर छापा टाकला. या मुलीची तेथून सुटका केली. तसेच त्या घराच्या मालकाला अटक केली. या मुलीला जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. पोलिसांनी या मुलीचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर कंदुकुर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी दिशा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
हे पण वाचा –
लाॅकडाउनमध्ये वाढली Sex Toys ची मागणी! कंडोमची ऑनलाईन विक्री तेजीत
धक्कादायक! वाहनामध्ये लैंगिक अत्याचार करून तरुणीला नग्न अवस्थेत रस्त्यावर सोडले
लज्जास्पद! नांदेडमध्ये शिक्षकांनीच केला सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार
गर्लफ्रेंडला भेटायला उस्मानाबादचा तरुण मोटारसायकलवरुन थेट पाकिस्तानला; BSF ने अडवले