बहिणीच्या अंगावरील जखमा पाहून भावाचा पारा चढला; मेव्हण्याला केली मरेपर्यंत मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – कानपुरमधील बिधून गंगापूर कॉलनीत राखी पौर्णिमेच्या दिवशी बहीण राखी बांधण्यासाठी भावाच्या घरी आली होती. यावेळी त्याला बहिणीच्या अंगावर मारहाण झाल्याच्या जखमा दिसल्या. या जखमा पाहून भावाचा पारा चढला. यानंतर त्याने रागाच्या भरात भावाने मेव्हण्याची गळा चिरून हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर तो तिथच थांबला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीला अटक केली आहे. या भागात राहणारे बीएसएनएलमधून रिटायर्ड रामबाबू मिश्रा यांनी आपली मुलगी संध्या हिचं लग्न तब्बल 14 वर्षांपूर्वी जवळ राहणारे लोडर चालक भानु वाजपेयी याच्यासोबत लावले होते. त्यांना अनिकेत आणि महक नावाची दोन मुले आहेत.

भानु हा दारूच्या आहारी गेला होता. दारूवरुन संध्या आणि भानुमध्ये नेहमी वाद होत होता. हे प्रकरण कोर्टात पोहोचलं होतं. यादरम्यान संध्या तब्बल अडीच वर्षांपर्यंत पतीपासून दूर माहेरी राहत होती. त्यानंतर भानू संध्याला घरी घेऊन गेला होता. मात्र त्याचं दारूचं व्यसन काही केल्या सुटत नव्हतं. त्यानंतरही दोघांमध्ये वाद सुरूच होता. राखी पौर्णिमेला भानुने संध्याला भावाच्या घरी सोडलं आणि तो कामावर निघून गेला. यानंतर संध्याचा छोटा भाऊ जो बीएच्या पहिल्या वर्षात शिकतो, त्याने बहिणीच्या शरीरावर मारल्याचे व्रण दिसले. हे पाहून त्याला धक्काच बसला. तो घराबाहेर गेला आणि त्याने दारू प्यायली. सायंकाळी तो घरी परतला तर संध्याला नेण्यासाठी भानुसोबत त्याची भेट झाली. दोघांमध्ये संध्याला मारहाण केल्याबद्दल मोठा वाद झाला.

यानंतर शेजारी पडलेल्या सुऱ्याने भावाने भानूवर हल्ला करून त्याची हत्या केली. मेव्हण्याची हत्या केल्यानंतर संध्याचा भाऊ तिथचं बसून राहिला. संध्याचं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा तिचा भाऊ अवघ्या 7 वर्षांचा होता. लहान पणापासून बहिणीला होणारा त्रास पाहून तिच्या भावाला त्रास होत होता. त्याच्या मनात भानुविषयी संताप निर्माण झाला होता. राखी पौर्णिमेच्या दिवशी बहिणीच्या चेहऱ्यावरील जखमा पाहून भावाचा पारा चढला आणि त्याने रागाच्या भरात भानूची हत्या केली.

Leave a Comment