औरंगाबाद । स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे आरक्षण कायम ठेवावे व मुस्लिम आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या ( बीआरएसपी) वतीने जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले त्यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवावे, मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण उच्च न्यायालयाने मान्य केले आहे. त्यांची
अंमलबजावणी करावी या मागणीसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे (बीआरएसपी) संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेश माने यांनी 17 जून रोजी राज्यभरात धरणे आंदोलन करण्याचे आदेश पक्ष कार्यकर्त्याना दिले होते. या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यानी हातात विविध घोषणांचे फलक घेऊन दोन्ही सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली घोषणाबाजीमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता यावेळी एस डी पी आईचे युसूफ खान पटेल जुबेर पैलवान मुजम्मिल खान व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी येऊन मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला.
त्यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे मराठवाडा उपाध्यक्ष अनिल साठे युवा जिल्हाध्यक्ष राजू निकाळजे अब्दुल ही कादरी शेख मुख्तार रवी मोरे संदीप ढोल पे राजू हिवराळे वंदना जाधव वर्षा जाधव दुर्गाबाई निकम प्रवीण निकाळजे जितेंद्र बोरडे अर्चना चव्हाण सुमित जाधव मनोज साळवे शुभम नवगिरे संतोष साबळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते