BSNL चा जबरदस्त प्लॅन! 6 महिने मिळणार मोफत इंटरनेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | BSNL ने आपल्या यूजर्ससाठी पुन्हा एकदा एक भन्नाट ऑफर आणली आहे. सरकार आता टेलिकॉम वापरकर्त्यांना पूर्ण 6 महिन्यांसाठी मोफत इंटरनेट देत आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना दर महिन्याला 1300GB हायस्पीड डेटा दिला जात आहे. कंपनीने आपल्या X हँडलद्वारे ही माहिती दिली आहे. BSNL चा हा ब्रॉडबँड प्लॅन देशातील सर्व दूरसंचार मंडळांसाठी आहे.

BSNL ने X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, हिवाळी बोनान्झा ऑफर अंतर्गत, युजरला भारत फायबर ब्रॉडबँड सेवा पूर्ण 6 महिन्यांसाठी 1,999 रुपयांमध्ये मिळेल. या प्लॅनमध्ये युजर्सना दर महिन्याला 25Mbps च्या स्पीडने 1300GB डेटा दिला जात आहे. FUP (फेअर यूसेज पॉलिसी) मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, युजरला 4Mbps च्या वेगाने अमर्यादित इंटरनेट मिळेल. या प्लॅनमध्ये यूजर्सना लँडलाईनद्वारे अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळते.

599 रुपयांची योजना

यापूर्वी BSNL ने 599 रुपयांचे स्पेशल टेरिफ व्हाउचर (STV) लॉन्च केले होते. या प्लान अंतर्गत मोबाईल यूजर्सना 84 दिवसांची वैधता मिळत आहे. याशिवाय यूजर्सला दररोज 3GB हायस्पीड डेटाचाही लाभ मिळणार आहे. या प्लॅनमध्ये, युजरला भारतातील कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएसचा लाभ मिळतो.

D2D सेवा

अलीकडेच, BSNL ने देशातील पहिली D2D म्हणजेच डायरेक्ट-टू-डिव्हाइस सेवा सुरू केली आहे. सॅटेलाइट बेस्ट: या सेवेमध्ये वापरकर्त्यांना कोणत्याही मोबाइल नेटवर्कशिवाय कनेक्टिव्हिटी मिळेल. विशेषत: आपत्कालीन परिस्थितीत ही सेवा वापरकर्त्यांना खूप मदत करणार आहे. वापरकर्ते कॉल करू शकतात आणि उपग्रहाद्वारे इंटरनेट वापरू शकतात.