BSNL ने आणलाय सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन; कमी पैशात मिळणार हे फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या टेलिकॉम क्षेत्रात, खासगी कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन आता खूप महाग झाले आहेत. जिओ, एअरटेल आणि व्हीआय या टेलिकॉम कंपन्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये कमी व्हॅलिडिटी असलेले स्वस्त रिचार्ज उपलब्ध आहेत. पण याचा कालावधीसुद्धा कमी असतो , त्यामुळे युजर्सना काहीच दिवसांत पुन्हा रिचार्ज करावा लागतो. जास्त कालावधीचा रिचार्जसाठी जास्त पैसे मोजावे लागतात , यामुळे लोकांची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत बीएसएनएलने स्वस्त रिचार्ज प्लॅन आणला आहे. ज्यामुळे ग्राहकांना जास्त कालावधी आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेता येईल .

105 दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन

बीएसएनएलच्या 666 रुपयांचा रिचार्ज प्लॅनमध्ये जास्त व्हॅलिडिटी दिली आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना 105 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे , ज्यामुळे त्यांना दीर्घ काळासाठी रिचार्ज करण्याची चिंता असणार नाही. हा प्लॅन खासकरून त्या युजर्ससाठी आहे ज्यांना कमी खर्चात अधिक सेवा हव्या आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार असून , तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय मित्र आणि कुटुंबीयांशी संवाद साधू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला दररोज 100 फ्री एसएमएस तसेच 2 जीबी डेटा देखील उपलब्ध होईल , यामध्ये युजर्सना एकूण 210 जीबी डेटा मिळतो.

ग्राहकांचे बीएसएनएलकडे आकर्षण

बीएसएनएलचा हा प्लॅन जिओ, एअरटेल आणि व्हीआय यांच्याकडे उपलब्ध असलेल्या इतर प्लॅनच्या तुलनेत खूप फायदेशीर आहे . त्यामुळे अनेक युजर्स त्यांच्या जुन्या नंबरला बीएसएनएलमध्ये पोर्ट करत आहेत. कारण या कंपनीने ग्राहकांना कमी किमतीत जास्त कालावधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे युजर्सना उत्तम सुविधांचा लाभ घेण्याची संधी मिळाली आहे. कमी किमतीत युजर्सना चांगल्या सेवांचा लाभ मिळत असल्याने, बीएसएनएलचा हा प्लॅन अनेक युजर्ससाठी एक आदर्श पर्याय ठरू शकतो.जर तुम्ही कमी किमतीत उत्तम टेलिकॉम सेवांच्या शोधात असाल तर , बीएसएनएलचा 666 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो.