BSNL ने आणला 200 रुपयांचा स्वस्त प्लॅन; 3 महिने रिचार्जचे टेन्शन नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जुलै महिन्यामध्ये अनेक खाजगी कंपन्यांनी त्याच्या रिचार्जच्या दरात वाढ केलेली आहे. त्यानंतर त्यांचे ग्राहक नाराज झालेले आहेत. एअरटेलची, जिओ तसेच वोडाफोन आयडिया या कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जच्या दरात वाढ केली. त्यामुळे अनेक ग्राहक BSNL कडे वळालेले आहेत. बीएसएनएल देखील त्यांच्या नवीन आलेल्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी आणि नवनवीन सुविधा देण्यासाठी नेहमीच तत्पर असते. अशातच आता बीएसएनएलने अगदी स्वस्त दरात एक नवीन प्लॅन ऑफर केलेला आहे. या प्लॅनची वैधता 90 दिवसांची असणार आहे. म्हणजेच 3 महिन्यांसाठी हा रिचार्ज प्लॅन असणार आहे. आता या रिचार्जच्या प्लॅन बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

बीएसएनएलने त्यांच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आणलेली आहे. अगदी स्वस्त किमतीमध्ये एक नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च केलेला आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत केवळ 200 रुपये आहे. आणि तुम्हाला 90 दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे. म्हणजे एकदा रिचार्ज केल्यावर तीन महिने तुम्हाला रिचार्जचे टेन्शन असणार नाही. ग्राहकांसाठी 201 रुपयांचा हा रिचार्ज प्लॅन अत्यंत उपयुक्त आहे.

इतर टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जच्या दरात वाढ केल्यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी महागाईच्या काळात हा दिलासा देणारा रिचार्ज प्लॅन असणार आहे. परंतु यामध्ये तुम्हाला इंटरनेटची सुविधा मिळणार नाही. तुम्ही फक्त कॉलिंगसाठी रिचार्ज करत असाल, तर हा रिचार्ज तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल. यामध्ये तुम्हाला 90 दिवसांची वैद्यता मिळणार आहे.

कोणत्या सुविधा मिळणार ?

बीएसएनएलच्या या 201 रुपयाच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 300 मिनिटे मोफत कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. म्हणजेच तीन महिन्यात तुम्ही 5 तास मोफत बोलू शकणार आहात. तसेच बीएसएनएलच्या इतर कोणत्याही नेटवर्कसोबत तुम्हाला मोफत कॉलिंगचा लाभ मिळणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट डेटा देखील असणार आहे. तुम्हाला 3 महिन्यासाठी 6 जीबी डेटा प्रदान केला जाणार आहे. तसेच 99 मोफत एसएमएसची सुविधा देखील यामध्ये आहे.

जर तुम्हाला जास्त रिचार्ज प्लॅनची गरज नसेल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे. 90 दिवसांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला चांगली सुविधा मिळेल. तसेच तुम्ही बीएसएनएलचा 499 चा रिचार्ज करू शकता. या प्लॅनची वैद्यता देखील 90 दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला अमर्यादित मोफत कॉलिंगचा सुविधा मिळते. तसेच 300 मोफत एसएमएसची सुविधा देखील यामध्ये मिळणार आहे.