BSNL कडून 275 रुपयांमध्ये अनिलिमिटेड कॉल्ससहीत मिळवा 3300 GB डेटा

BSNL
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL : आजकाल ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धा सुरु आहे. याचा फायदा ग्राहकांना देखील होतो आहे. कारण यामुळे ग्राहकांसाठी अनेक चांगल्या रिचार्ज ऑफर्स उपलब्ध होत आहेत. अशातच सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL कडून ब्रॉडबँड प्लॅन्स अंतर्गत फक्त 275 रुपयांमध्ये 3300 GB पर्यंत डेटाची ऑफर दिली जाते आहे. याशिवाय 775 मध्ये 2000 GB पर्यंत डेटा दिला जात आहे. चला तर मग याबाबत अधिक तपशीलपणे जाणून घेउयात…

BSNL Prepaid Recharge Plans 2021: BSNL revises Rs 2,399 and Rs 1,999 prepaid recharge plans - Check details

इथे हे लक्षात घ्या कि, BSNL कडून स्वातंत्र्य दिनानिमित्त ऑफर अंतर्गत आपल्या जुन्या प्लॅनच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. याआधी या तीनही प्लॅन्सची अंतिम मुदत 15 नोव्हेंबर रोजी होती, आता ती 14 डिसेंबरपर्यंत पुढे वाढवण्यात आली आहे. यामध्ये 275 रुपयांचे 2 आणि 775 रुपयांच्या एका प्लॅनचा समावेश आहे. चला या तीन योजनांबद्दल तपशीलवार माहिती घेऊया.

Work from Home Broadband Plans: BSNL Introduces Free of Cost Plan With 5GB Daily Data

275 रुपयांचा प्लॅन

BSNL कडून 275 रुपयांचे 2 ब्रॉडबँड प्लॅन लाँच करण्यात आले होते. याआधी या प्लॅनची किंमत 449 रुपये होती. ज्यामध्ये 3300GB डेटा मिळेल, ज्याचा स्पीड 30Mbps असेल. याशिवाय, व्हॅलिडिटी पूर्ण होईपर्यंत अनिलिमिटेड फ्री कॉलची सुविधा देखील उपलब्ध असेल. या प्लॅनची ​​व्हॅलिडिटी 75 दिवसांची आहे. दुसरा प्लॅन इतर सर्व बाबतीत सारखाच आहे मात्र स्पीड 60 Mbps आहे. त्याच वेळी, 3300 GB डेटा संपल्यानंतर या दोन्ही प्लॅनचा स्पीड 4 Mbps पर्यंत खाली येईल.

BSNL Offer will be Removed on this Fiber Broadband Plan check last date - Tech news hindi - BSNL यूजर्स को तगड़ा झटका! अगले महीने से बंद हो रहा कंपनी का सबसे

BSNL च्या एंट्री प्लॅनपेक्षा स्वस्त

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लॉन्च केलेले हे प्लॅन बीएसएनएलच्या एंट्री लेव्हल फायबर ब्रॉडबँड प्लॅनपेक्षा स्वस्त आहेत. कंपनीचा नियमित एंट्री लेव्हल प्लॅन 329 रुपये प्रति महिना आहे, ज्यामध्ये 1000 GB डेटा दिला जातो. तसेच यामध्ये 1000 GB डेटा संपल्यानंतर 4 Mbps पर्यंत स्पीड खाली येईल.

अशा प्रकारे खरेदी करा प्लॅन

हे प्लॅन बीएसएनएलची वेबसाइट आणि जवळच्या बीएसएनएल ऑफिसमधूनही खरेदी करता येईल. हे प्रमोशनल प्लॅन असल्यामुळे 14 डिसेंबरपर्यंतच त्यांचे फायदे मिळतील.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bsnl.co.in/opencms/bsnl/BSNL/services/broadband/

हे पण वाचा :
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 4 वर्षात गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
आता इंटरनेटशिवायही करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया
Train Cancelled : आजही रेल्वेने रद्द केल्या 185 गाड्या !!! अशा प्रकारे तपासा आपल्या ट्रेनचे स्टेट्स
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ, आजचे नवीन दर तपासा
Saving Account : ‘या’ बँकांच्या बचत खात्यावर मिळेल 7-7.50% पर्यंतचा व्याजदर