Wednesday, June 7, 2023

BSNL ग्राहकांसाठी आंनदाची बातमी !!! आता ‘या’ प्लॅनमध्ये मिळणार डेली 2GB डेटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL : आजकाल जवळपास सर्वच टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक दर्जेदार ऑफर्स आणत आहेत. रिलायन्स जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल सारख्या कंपन्यांनीही अनेक प्लॅन्स जाहीर केले. या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आता बीएसएनलने देखील अनेक प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत. इतर टेलिकॉम कंपन्यांप्रमाणेच बीएसएनल देखील आपल्या काही रिचार्ज प्लॅन सह OTT बेनिफिट्स ऑफर देत आहे. आज आपण बीएसएनलच्या अशा दोन प्लॅनबाबत माहिती जाणून घेणार आहोत. बीएसएनलच्या या 2 प्लॅनची ​​किंमत ₹98 आणि ₹447 असेल.

BSNL च्या 447 रुपयांच्या प्लॅन मध्ये एकूण 100 GB डेटा दिला जातो. यामध्ये डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 80Kbps पर्यंत खाली येईल. यामध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस देखील मिळतील. यासोबतच ग्राहकांना Eros Now Entertainment आणि बीएसएनएल ट्यून्सचा फ्री एक्सेस देखील दिला जातो.

Alert! THESE 4 BSNL recharge plans will be stopped | Technology News | Zee  News

बीएसएनलच्या 98 रुपयांच्या प्लॅन मध्ये डेली 2GB डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनची ​​व्हॅलिडिटी 22 दिवसांची आहे आणि यामध्ये एकूण 44 GB हाय स्पीड डेटा मिळेल. हा 98 रुपयांचा प्लॅन इतर कोणत्याही कंपनीकडे नाही. च्या प्लॅनबद्दल आणखी सांगायचे झाले तर, यामध्ये Eros Now Entertainment चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. मात्र इथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, हा फक्त एक डेटा व्हाउचर आहे, ज्यामध्ये व्हॉईस कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधा मिळणार नाही.

BSNL to Not Wait Long for 5G after 4G

वोडाफोन आयडिया, रिलायन्स जिओ आणि एअरटेल सारख्या कंपन्यांच्या प्रीपेड रिचार्जमध्ये Disney+ Hotstar सारख्य सुविधा मिळतात. त्याच वेळी, Jio च्या पोस्टपेड प्लॅन मध्ये Netflix, Prime Video आणि Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन मिळेल.

BSNL Rs 1,999 Prepaid Recharge Revised to Offer Eros Now Content for 365  Days

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या :  https://www.bsnl.co.in/opencms/bsnl/BSNL/services/mobile/prepaid_plans.html

 

हे पण वाचा :

Airtel Price Hike : Airtel च्या ग्राहकांना पुन्हा बसणार धक्का, प्रीपेड प्लॅन्स आणखी महागणार

Airtel च्या ‘या’ प्रीपेड प्लॅनमध्ये मिळत आहे Amazon Prime चे Free सब्सक्रिप्शन

BSNL चा धमाकेदार प्लॅन : Jio अन Airtel पेक्षाही स्वस्त; 19 रुपयात महिनाभर घेता येणार अनेक फायदे

Airtel चा नवा प्लॅन : Netflix वर मोफत पहायला मिळणार मनसोक्तपणे Movies – Web Series