हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL कडून ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे ब्रॉडबँड प्लॅन ऑफर केले जातात. ज्याची किंमत 350 रुपयांपेक्षा कमी आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसोबत इंटरनेट डेटाचे फायदे दिले जातात. चला तर मग या कंपनीच्या प्लॅन बाबतची माहिती जाणून घेऊया…
329 रुपयांचा प्लॅन
यामध्ये ग्राहकांना 20Mbps च्या स्पीडने 1000GB डेटा मिळतो. तसेच इंटरनेट लिमिट संपल्यानंतर याचा स्पीड 4 एमबीपीएस पर्यंत खाली येतो. यासोबतच ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे.
399 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये ग्राहकांना 30Mbps च्या स्पीडने 1000GB डेटा मिळतो. तसेच इंटरनेट डेटा लिमिट संपल्यानंतर याचा स्पीड 4Mbps पर्यंत खाली येईल. यासोबतच ग्राहकांना फ्री कॉलिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे.
449 रुपयांचा प्लॅन
BSNL च्या याप्लॅनमध्ये ग्राहकांना 30Mbps च्या स्पीडने 3300GB डेटा मिळतो. तसेच इंटरनेट डेटा लिमिट संपल्यानंतर, इंटरनेटचा स्पीड 4Mbps पर्यंत खाली येईल. यामध्ये ग्राहकांना फ्री कॉलिंगची सुविधा देखील मिळते.
499 रुपयांचा प्लॅन
यामध्ये ग्राहकांना 40Mbps च्या स्पीडने 3300GB डेटा मिळतो. तसेच इंटरनेट डेटा लिमिट संपल्यानंतर, डेटा स्पीड 4Mbps पर्यंत खाली येईल. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते.
एका रिपोर्टनुसार, BSNL ने आपल्या पोर्टफोलिओमधून 275 रुपयांचे दोन प्लॅन काढून टाकले आहेत. यामध्ये 60Mbps च्या स्पीडने 3.3TB डेटा दिला जात होता. या प्लॅनच्या किंमती कमी असल्यामुळे त्या ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय होत्या.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bsnl.co.in/opencms/bsnl/BSNL/services/broadband/volume_based_BB.html
हे पण वाचा :
Bank Loan : नवीन वर्षात ‘या’ दोन बँकांनी ग्राहकांना दिला मोठा झटका, आता कर्ज घेणे महागले
‘या’ Post Office योजनेमध्ये गुंतवणूक करून दरमहा मिळवा 2500 रुपये
New Business Idea : टोमॅटो केचपच्या व्यवसायाद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न
Indian Overseas Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, जाणून घ्या नवीन दर
Money Laundering म्हणजे काय ??? याद्वारे काळा पैसा पांढरा कसा केला जातो हे समजून घ्या