BSNL Plans | BSNL ने आणला सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लॅन; 120 रुपयात अनलिमिटेड कलिंगसह मिळणार डेटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

BSNL Plans | एअरटेल, जिओ, वोडाफोन आयडिया या भारतातील काही प्रमुख अशा खाजगी टेलिफोन कंपनी आहेत. या टेलिकॉम कंपन्यांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच त्यांच्या रिचार्जमध्ये वाढ केलेली आहे. त्यामुळे त्यांचे ग्राहक प्रचंड नाराज झालेले आहेत. या सगळ्यातच सरकारी कंपनी बीएसएनएलने चांगलीच उभारी घेतलेली आहे. बीएसएनएल त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन सुविधा पुरवत आहेत. BSNL ने नुकतेच काही नवीन रिचार्ज प्लॅन जारी केलेले आहेत. याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.

बीएसएनएल 118 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलच्या या 118 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन ची वैधता 20 दिवसांची आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित वाईस कॉलची सुविधा मिळते. तसेच तुम्हाला 10 जीबी डेटा मिळतो. यास तुम्हाला हार्डी गेम्स, एरिना गेम्स, गेम्सऑन, लिस्टन, पोडो कॉस्ट, झिंग म्युझिक सारख्या विविध गोष्टींचा देखील फायदा मिळतो.

बीएसएनएल सुपरफास्ट इंटरनेट आणण्याच्या तयारी

बीएसएनएल ही लवकरच त्यांच्या लाखो ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आणण्याच्या तयारीत आहे .याबाबत बीएसएनएलने त्यांच्या सोशल मीडियावर देखील एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. या व्हिडिओत ते लवकरच सुपरफास्ट इंटरनेटची कनेक्टिव्हिटी जारी करणार आहेत. याबाबतची माहिती दिलेली आहे. बीएसएनएल अनेक ठिकाणी 4 G टॉवर्स देखील बसवणार आहेत. बीएसएनएल हे दिवाळीपर्यंत 75 हजार 4G मोबाईल टॉवर्स बसवण्याची योजना करत आहेत. यामुळे आता ग्रामीण भागातील लोकांना नेटवर्क कनेक्टिव्हिटीची समस्या येत होती. ती देखील दूर होणार आहे. तसेच बीएसएनएलच्या विकासामुळे इतर खाजगी कंपन्यांमध्ये देखील मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे.

बीएसएनएलचे यूजर संपूर्ण भारतात पसरलेले आहे. शहरापासून ते खेडंपाड्यापर्यंत अनेक लोक बीएसएनएलचे ग्राहक आहेत. परंतु अजूनही बीएसएनएलने त्यांची 4G सेवा चालू केलेली नाही. यामुळे अनेक ग्राहकांना इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये मोठ्या समस्या निर्माण होत आहेत. बीएसएनएल लवकरच या समस्येवर तोडगा काढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर भारतातील सर्व बीएसएनएल ग्राहकांना 4G नेटवर्कचा आनंद घेता येणार आहे.