BSNL Recharge Plan : BSNL चा 107 रुपयांचा रिचार्ज प्लॅन; मिळतात जबरदस्त फायदे

0
2
BSNL Recharge Plan 107 rs
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

BSNL Recharge Plan : देशी टेलिकॉम कंपनी BSNL आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. Jio आणि Airtel तसेच VI पेक्षा BSNL चे रिचार्ज खूप स्वस्त आहेत. त्यामुळे कंपनीचा ग्राहकवर्ग सुद्धा दिवसेंदिवस वाढतच आहे.कमी पैशात जास्तीत जास्त लाभ मिळत असल्याने BSNL गरिबांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी परवडणारी टेलिकॉम कंपनी मानली जाते. आताही कंपनीने ग्राहकांची गरज लक्षात घेऊन एक नवा रिचार्ज प्लॅन आणला आहे. हा रिचार्ज फक्त १०७ रुपयांचा असून यामध्ये तुम्हाला कोणकोणता लाभ मिळणार हे आज आपण जाणून घेऊयात……

जास्ती करून आपल्याकडे २ सिमकार्ड असतात आणि त्यातील एकाच कार्डला आपण रिचार्ज करतो, अशावेळी दुसऱ्या सिमकार्डला जास्त दिवस रिचार्ज केला नाही तर ते कार्ड बंद पडण्याची शक्यता असते. आणि कार्ड बंद पडलं तर तुमचा लोकांशी संपर्क तुटण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे तुमचं कार्ड जर ऍक्टिव्ह ठेवायचं असेल तर तुम्हाला BSNL चा हा १०७ रुपयांत हा रिचार्ज प्लॅन (BSNL Recharge Plan) परवडणारा ठरेल. कारण या रिचार्जवर ग्राहकांना तब्बल 35 दिवसांची व्हॅलिडिटी मिळत आहे. इतर कंपन्यांशी तुलना केल्यास BSNL चा हा रिचार्ज नक्कीच तुम्हाला परवडेल.

१०७ रुपयांच्या रिचार्ज मध्ये काय आहे खास – BSNL Recharge Plan

BSNL च्या या १०७ रुपयांच्या रिचार्ज प्लॅन मध्ये वापरकर्त्यांना फ्री इंटरनेट डेटा आणि यासोबत फ्री अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. यामध्ये यूजर्सना एकूण 3GB डेटाचा फायदा मिळतो. या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना 35 दिवसांची वैधता मिळते. हा प्लॅन खास करून त्या लोकांना जास्त उपयुक्त आहे ज्यांच्याकडे २ सिम आहेत आणि त्यांना त्यांचे BSNL सिमकार्ड नेहमी ऍक्टिव्ह ठेवायचं आहे.