हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन BSNL Recharge Plan । एकीकडे एअरटेल, जिओ, वोडाफोन-आयडिया सारख्या कंपनाच्या महागड्या रिचार्ज प्लॅन मुळे ग्राहकांचे कंबरडे मोडले असताना दुसरीकडे देशी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL मात्र आपल्या ग्राहकांसाठी कमी पैशात परवडेल असे रिचार्ज प्लॅन आणत असते. यापूर्वी कंपनीने २९९ आणि ५९९ रुपयांचे रिचार्ज प्लॅन लाँच केले होते. आता त्यापेक्षाही कमी किमतीत BSNL नवा प्लॅन आणला आहे. बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन अवघ्या १९८ रुपयांचा असून यामध्ये तब्बल ४० दिवस लाभ घेता येतोय. या रिचार्ज प्लॅन मध्ये नेमक्या कोणकोणत्या सुविधा मिळतात ते आपण जाणून घेऊयात.
198 रुपयांच्या प्लॅन मध्ये काय सुविधा – BSNL Recharge Plan
BSNL च्या १९८ रुपयांच्या रिचार्ज प्लॅन मध्ये (BSNL Recharge Plan) ग्राहकांना महत्वाची बाब म्हणजे ४० दिवसाची व्हॅलिडिटी मिळतेय. तुम्ही इतर कंपन्यांची तुलना केल्यास तुम्हाला १९८ रुपयांत फक्त २४ किंवा २८ दिवसांचीच वैधता मिळते, मात्र बीएसएनएलचे ४० दिवसांचा प्लॅन लाँच करत एअरटेल जिओची झोप उडवली आहे. यासह ग्राहकांना ४० दिवसांसाठी दररोज २ GB इंटरनेट डेटाचा लाभ घेता येईल. मात्र बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅन मध्ये कॉलिंगची कोणतीही सुविधा नाही, तसेच तुम्ही कोणाला एसएमएस सुद्धा करू शकणार नाही.. हा फक्त इंटरनेट वापरण्यासाठीचा रिचार्ज प्लॅन आहे. ज्यांना फक्त इंटरनेटची गरज असते अशा ग्राहकांना बीएसएनएलचा हा १९८ रुपयांचा प्लॅन उपयुक्त आहे.
याशिवाय बीएसएनएलने आणखी २ रिचार्ज प्लॅन लाँच (BSNL Recharge Plan) केले आहेत. त्यातील पहिला आहे तो म्हणजे २९९ रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅन मध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दिवसाला १०० एसएमएस, दररोज 3GB इंटरनेट, सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. २९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन ३० दिवसाच्या व्हॅलिडिटीसह येतो. तर दुसरा रिचार्ज आहे ५९९ रुपयांचा, जो ८४ दिवसाच्या व्हॅलिडिटी सह येतो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दिवसाला १०० एसएमएस, दररोज 3GB इंटरनेट वापरण्याची सुविधा मिळते.




