हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशी टेलिकॉम कंपनी BSNL चे रिचार्ज प्लॅन (BSNL Recharge Plan) अतिशय कमी किमतीत उपलब्ध असतात. त्यातच ३ जुलै पासून एअरटेल, जिओ सारख्या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्याने अनेक ग्राहकानी आपला मोर्चा BSNL कडे वळवला आहे. सध्याच्या महागाईच्या काळात बीएसएनएलचे रिचार्ज ग्राहकांसाठी आशेचा किरण ठरत आहे असच म्हणावं लागेल. तुम्ही सुद्धा बीएसएनएलचे ग्राहक असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी अशाच एका स्वस्तात मस्त आणि खिशाला परवडणाऱ्या रिचार्ज बद्दल सांगणार आहोत.
BSNL चा 229 रुपयांचा रिचार्ज – BSNL Recharge Plan
आम्ही तुम्हाला ज्या रिचार्ज बद्दल सांगत आहोत तो आहे BSNL चा 229 रुपयांचा रिचार्ज प्लॅन… हा रिचार्ज प्लॅन ३० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅन अंतर्गत ग्राहकांना दररोज 2 जीबी इंटरनेट डेटाचा लाभ घेता येतोय. तसेच या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS ची सुविधा मिळतो. ज्या यूजर्स ना जास्तीत जास्त इंटरनेट वापरयाला लागत अशा ग्राहकांसाठी हा प्लॅन नक्कीच परवडणार आहे. बीएसएनएलचा हा एकमेव प्लॅन (BSNL Recharge Plan) आहे तो संपूर्ण ३० दिवसांसाठी आहे. आणि महत्वाची बाब म्हणजे याच डेटा पॅक वाला दुसऱ्या कंपनीचा रिचार्ज प्लॅन बीएसएनएल पेक्षा खूप महाग आहे.
BSNL ला TATA ची साथ –
एकीकडे, Jio-Airtel ने आपले रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत, तर दुसरीकडे, BSNL ने सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी TATA सोबत हातमिळवणी केली आहे. टाटाची IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS आणि BSNL यांच्यात 15,000 कोटी रुपयांचा करार झाला आहे, ज्यामुळे भारतातील 4G नेटवर्कमध्ये सुधारणा होईल. 5G नेटवर्कसाठी मैदान तयार केले जाईल. TCS आणि BSNL मिळून भारतातील सुमारे 1000 गावांमध्ये 4G इंटरनेट सेवा पोहोचवतील. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना सुद्धा फास्ट इंटरनेट सेवेचा लाभ घेता येणार आहे. आतापर्यंत Jio आणि Airtel सारख्या दूरसंचार कंपन्यांचे 4G नेटवर्कवर वर्चस्व होते, परंतु BSNL च्या या करारामुळे जिओ आणि एअरटेलच टेन्शन वाढण्याची चिन्हे आहेत.