BSNL Recharge Plan । प्रसिद्ध देशी टेलिकॉम कंपनी BSNL नेहमीच्या आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. Jio, airtel आणि VI यांच्या रिचार्ज प्लॅन मध्ये BSNL चे रिचार्ज खूपच कमी किमतीत उपलब्ध असतात. त्यामुळे गोरगरीब जनतेला सुद्धा हे रिचार्ज परवडत असतात. कंपनी सुद्धा नेहमी नवनवीन रिचार्ज प्लॅन आणत ग्राहकांना खुश करत असते. आताही BSNL ने असाच एक नवा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे, ज्याची किंमत अवघी ४८ रुपये आहे. आज आपण या रिचार्ज प्लॅन बद्दल सविस्तर पणे जाणून घेणार आहोत.
काय फायदा मिळतो – BSNL Recharge Plan
आम्ही तुम्हाला ज्या प्लॅन बद्दल सांगत आहोत त्यामध्ये तुम्हाला ४८ रुपयांत ३० दिवसांची व्हॅलिडिटी मिळतेय. हा रिचार्ज प्लॅन अशा ग्राहकांसाठी उपयुक्त आहे, ज्यांच्या BSNL चे कार्ड हे दुसरा पर्याय म्हणून उपलब्ध आहे. म्हणजेच काय तर, सिम कार्ड ऍक्टिव्ह राहावं, ते कधीही बंद पडू नये म्हणून तुम्ही BSNL चा ४८ रुपयांचा रिचाह्र्ज प्लॅन मारू शकता. ४८ रुपयांच्या या रिचार्ज मध्ये तुमच्या डेटा आणि कॉलिंगच्या गरजा पूर्ण होतील पण तुम्हाला त्यात जास्त इंटरनेट डेटा मिळणार नाही. मात्र ३० दिवस म्हणजेच एक महिनाभर तुमचं कार्ड ऍक्टिव्ह राहू शकते.
BSNL च्या 48 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये (BSNL Recharge Plan) यामध्ये ग्राहकांना 10 रुपयांचा टॉकटाइम बॅलन्स मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना कॉल करू शकता. तसेच या प्लॅन मध्ये ग्राहकांना 20 पैसे प्रति मिनिट या दराने मूलभूत डेटा कनेक्टिव्हिटी आणि इंटरनेटचा वापर करता येईल. या रिचार्ज प्लॅनचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांकडे आधीपासूनच एक्टिव प्रीपेड प्लान असणे आवश्यक आहे. सध्या तरी बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानच्या सर्कलमध्ये उपलब्ध आहे.