हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लॅन वाढवले आहेत. त्यामुळे असंख्य ग्राहकवर्ग कमी किमतीत चांगल्या सुविधा देणाऱ्या BSNL कडे वळत आहेत. बीएसएनएलने वाढता ग्राहकवर्ग तसेच मागणीचा विचार करत देशभरात 4G आणि 5G सेवांचा विस्तार केला आहे. या सेवा 1000 हून अधिक ठिकाणी उपलब्ध झाल्या असून , त्यामुळे ग्राहक याकडे आकर्षित होऊन नवीन सिम घेत आहेत , अशा ग्राहकांसाठी बीएसएनएल एक आनंदाची बातमी घेऊन आले आहे. आता BSNL तुम्हाला तुमचा आवडीचा मोबाईल नंबर निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या आवडीनुसार मोबाईल नंबर निवडण्याची मुभा मिळेल.
आवडीनुसार फोन नंबर मिळणार
तुम्हाला तुमच्या आवडीनुसार फोन नंबर हवा असल्यास प्रथम तुम्ही कोणत्याही सर्च इंजिनवर BSNL Choose Your Mobile Number असे सर्च करा. त्यानंतर तुमच्या समोर cymn असे येईल त्या लिंकवर क्लिक करा . ते केल्यानंतर तुम्ही स्थायी असलेले राज्य आणि झोन पर्याय येईल, त्यामध्ये दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम असे ऑपशन दिसतील त्यातील योग्य पर्याय निवडा. तुम्हाला नंबरची सुरुवात , शेवटचा नंबर किंवा संख्यांची बेरीज या आधारावर तुमचा पसंतीचा नंबर शोधावा लागेल. जर तुम्हाला फॅन्सी नंबर पाहिजे असेल तर फॅन्सी नंबर टॅबवर क्लिक करून फॅन्सी नंबरही तपासू शकता. नवीन नंबर घेण्यासाठी तुम्हाला सध्या वापरात असलेल्या नंबरवर एक OTP येईल , तो ओटीपो टाकल्यानंतर तुम्हाला नवीन नंबर उपलब्ध होईल . हि सर्व प्रक्रिया झाल्यानंतर निवडलेला नंबर मिळवण्यासाठी BSNL कार्यालयाला भेट द्यावी लागेल .
इतर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर
हि सर्व प्रोसिजर ऑनलाईन असून, या नवीन सेवेमुळे ग्राहक जास्त प्रमाणात आकर्षित होणार आहेत. त्यामुळे इतर टेलिकॉम कंपन्यांना जोरदार टक्कर मिळणार आहे. हि सगळी प्रक्रिया अगदी विनामूल्य देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना फॅन्सी नंबर घेण्यासाठी पैसे देण्याची गरज नाही .